ब्रेकिंग

कर्जत तालुका वृत्तपत्र वितरक संघाच्या अध्यक्षपदी विशाल रेणूकर यांची निवड

संपादक- दिलीप अनारसे

कर्जत : कर्जत तालुका वृत्तपत्र वितरक संघटनेच्या अध्यक्षपदी विशाल रेणूकर यांची तर सचिवपदी नानासाहेब साबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
कर्जत तालुका वृत्तपत्र वितरक संघटनेचे मावळते उपाध्यक्ष किशोर आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्जत तालुका वृत्तपत्र वितरक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी राशीनचे विशाल रेणूकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – महंमद पठाण, सचिव – नानासाहेब साबळे, सहसचिव – ज्ञानेश्वर ढाणके, खजिनदार – दिलीप अनारसे, कार्याध्यक्ष – मोतीराम शिंदे, सदस्य : किशोर आखाडे, सुभाष माळवे, मच्छीन्द्र अनारसे, किशोर कांबळे, मुन्ना पठाण, अशोक शिंदे, डॉ अफरोजखान पठाण, अभय आचार्य, राजेंद्र माने, संतोष रणदिवे, संतोष लोंढे, सुनील वारे, शरद शेलार यांची निवड करण्यात आली. यावेळी नुतन कार्यकारीणीचा सत्कार करण्यात आला. कर्जत तालुका पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लबच्या वतीने नुतन पदाधिकाऱ्याना शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना नुतन अध्यक्ष विशाल रेणूकर यांनी कर्जत तालुक्याच्या वृत्तपत्र वितरकाच्या अडी-अडचणीवर सर्वाना सोबत घेऊन काम करण्याचा मानस व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे