ब्रेकिंग

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट मिरजगाव संस्थेने बावडकर कुटुंबीयांना दिला आठ लाख 12 हजार रुपयांचा आधार.

मिरजगाव प्रतिनिधी-अमोल खरपुडे

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट मिरजगाव संस्थेने बावडकर कुटुंबीयांना दिला आठ लाख 12 हजार रुपयांचा आधार.  • मिरजगाव प्रतिनिधी अमोल खरपुडे

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट ने सामाजिक बांधिलकी जपत असताना संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपल्या परिवारातील एक घटक आहे. संस्थेतील कर्जदार किंवा सभासद यांचे अपघात झाल्यास या कुटुंबावर अचानक संकट येते त्यात कर्जाचा बोजा यामुळे कुटुंबाची वाताहत होते त्यामुळे कर्जाचा भार उचलण्याचे काम नागेबाबासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कडुभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे त्यातून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन नागेबाबा परिवारातील सदस्य माननीय श्री राजेंद्र चिंधे यांनी केले मिरजगाव येथील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट मिरजगाव शाखेचे युवक खातेदार श्री अभिजीत भाऊसाहेब बावडकर यांना अपघाती विमा रक्कम 812000
(अक्षरी -आठ लाख 12 हजार रुपये ) चा धनादेश नागेबाबा मल्टीस्टेट च्या वतीने सुपूर्त करण्यात आला यावेळी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री .प्रशांत बुद्धीवंत शिवसेना नेते श्री .अमृतजी लिंगडे मिरजगाव ग्रामपंचायत सदस्य श्री. सागर पवळ ,सलीम अतार प्राचार्य.सूर्यवंशी सर, संस्थेचे मा. अनिल कदम सर, मीनाक्षी पंडित, शाखाधिकारी श्री हारदे अमोल, श्री तुपे अमोल, श्री महेश दारुंदे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे