गुन्हेगारीब्रेकिंग

स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दहा लाखांचा दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकास कर्जत पोलिसांकडून अटक..

कर्जत प्रतिनिधी

 

 

स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दहा लाखांचा दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकास कर्जत पोलिसांकडून अटक..


कर्जत प्रतिनिधी-


दिनांक 9/2/2022 रोजी दुपारी 03/00 वाजेच्या सुमारास अहमदनगर ते सोलापूर रोडवर कोंभळी फाट्याच्या दिशेने कोंभळी ते कर्जत जाणाऱ्या रोड पासून अंदाजे दोन ते तीन किमी अंतरावर शेतात फिर्यादी नामे संतोष रामचंद्र घुडे, वय 43 वर्षे, धंदा बांधकाम व्यवसायिक रा.आंबिवली ता. कर्जत जि. रायगड व त्यांचा मित्र यातील साक्षीदार यांना कमी किंमतीत सोने विकत घेण्याच्या बहाण्याने आरोपी नामे विठ्ठल जाधव ( खरे नाव माहित नाही ) यांनी घेऊन जाऊन त्याच्या सोबत असणारे दहा ते बारा अनोळखी इसमांनी बोलावून फिर्यादी व साक्षीदार मजकूर यांना लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांचे डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम दहा लाख रुपये व तीन मोबाईल हँडसेट असे एकूण 10,18,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून कर्जत पो स्टे गुन्हा रजिस्टर नंबर 76/2022 भादवि कलम 395 प्रमाणे दि. 11/02/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास कर्जत पोलीस करीत असताना सदरचा गुन्ह्यातील आरोपी नामे सचिन आल्या पवार रा. राक्षसवाडी ता. कर्जत याने त्याचे साथीदारांसोबत केला असल्याचे बातमी मिळाल्याने व सदर चा आरोपी सचिन आल्या पवार हा कुळधरण गावचे परिसरात आल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत मार्फत बातमी मिळाल्याने लागलीच कर्जत पोलिसांनी आरोपी सचिन आल्या पवार, वय 26, राहणार राक्षसवाडी, ता. कर्जत यास ताब्यात घेतले. त्यास सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. अटक आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस 5 दिवस पोलीस कोठडी दिली आहे.पुढील तपास पोसई अमरजीत मोरे व महादेव कोहक हे करत आहेत.

सदरची कारवाई-
मा.पोलीस अधिक्षक सो.श्री.मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,
अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल,
उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग श्री.आण्णासाहेब जाधव,यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , पोलीस उपनिरीक्षक मोरे, पो हवा अंकुश ढवळे, पो हवा सुनील चव्हाण, पोना पांडुरंग भांडवलकर, पोना शाम जाधव, पोकॉ सुनील खैरे, पोकॉ महादेव कोहक, गोवर्धन कदम यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे