आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
अंबिजळगाव विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता कमी होत चालली आहे – सरपंच विलास आप्पा निकत
कर्जत प्रतिनिधी

अंबिजळगाव विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता कमी होत चालली आहे.. – सरपंच विलास आप्पा निकत
कर्जत प्रतिनिधी – संपादक दिलीप अनारसे
कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थीयाची शैक्षणिक गुणवत्ता कमी होत चालली आहे. आज पर्यंत विद्यालयाचा विद्यार्थी टॉप लेवल वर असायचे मग आजच शाळेतील विद्यार्थ्यांना काहीच येत नाही असी तक्रार पालक वर्गातुन होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंबिजळगाव या विद्यालय मध्ये विध्यार्थ्यांनच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार नेमके कोण ? तर याचे उत्तर असेल शिक्षक. कारण सध्या या विद्यालयात शिकणाऱ्या विध्यार्थ्यांनच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस शिक्षकच जबाबदार आहेत. सर्व विषयांना शिक्षक आहेत. परंतु एकही शिक्षक आपले काम प्रभावीपणे पार पाडताना दिसत नाहीत. पालक विद्यालयात गेले तर पालकांना एकाही प्रश्नाचं उत्तर बरोबर विद्यार्थांनी दिले नाही. उलट उत्तर दिले जात आहेत. तसेच या विद्यालयात शिकलेले विध्यार्थी भविष्यात काहीही करू शकणार नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षण व शिक्षकांची बदलत चाललेली मानसिकता कारणीभूत आहे. विद्यालयात सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तरी विध्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकवले जात नाही. वारंवार मुख्याध्यापकांची भेट घेतली पण त्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही.
हे विद्यालय खूप खडतर प्रवास करून उभे केले आहे. आणि आता हेच विद्यालय आमच्या डोळ्यासमोर कोलमडून चाललेले पाहून आम्हाला सहन होत नाही.शिक्षकांनी आपले प्रत्येक काम चोखपणे केले तर या गावातील विद्यालय पुन्हा एकदा खूप सुंदरपणे उभारी द्यायची असेल तर ठराविक शिक्षकांच्या बदल्या होणे गरजेचे आहे. कारण महत्वाचे विषयांकडे खूप दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे विध्यार्थ्यांना होणाऱ्या नुकसानभरपाई कोण देणार हा प्रश्न पालकांना सतावत असल्याने सध्या विद्यालयातील विध्यार्थ्यांच्या संख्या कमी होताना दिसत आहे. या शैक्षणिक वर्षात पंचक्रोशीतील शेगुड, खातगाव, सटवाईवाडी, या गावातील जवळजवळ 80ते 90 विध्यार्थ्यांनी कर्जत ला जाऊन शिक्षण घेतले जाते आहे. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
5/5 - (1 vote)