कर्जतकर महिला ग्रामीण पतसंस्थेचे दिमाखात उद्घाटन.
कर्जत प्रतिनिधी :
कर्जतकर महिला ग्रामीण पतसंस्था शहराच्या विकासात महत्वाची भूमिका संपादन करेन. महिलांनी एकत्र येत पतसंस्थेची उभारणी केली असून प्रथमता त्यांच्या महत्वकांक्षेला सलाम असे प्रतिपादन सहाय्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी यांनी केले. ते कर्जत येथे कर्जतकर पतसंस्थेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येस बँकेचे रूरल हेड विजयकुमार फरांडे होते . विजयकुमार फरांडे यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध लाभदायक ठेवी योजना, कर्ज सुविधा यासह त्यातून मिळणारे उत्पन्नाचे साधने त्यातून व्यवसायाची होणारी प्रगती याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रथमताच महिला-भगिनींनी व्यावसायिक क्षेत्रात खासकरून बँकिंग क्षेत्रात क्रांतीकारक पाऊल उचलल्याचे समाधान आहे. निश्चित भविष्यात कर्जतकर महिला पतसंस्था शहर आणि तालुक्यातील उद्योजक महिलांना प्रोत्साहन देत विकासाच्या जडण-घडणीत खास भूमिका निभावतील असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, श्रीकांत तोरडमल आणि संतोष भनगडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेच्या अध्यक्षा अलका फरांडे यांनी केले तर शेवटी आभार शारदा तोरडमल यांनी मानले. उपस्थित असणाऱ्या सर्व खातेदारांना आणि व्यापारी बांधवास पतसंस्थेकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी नगरसेविका प्रतिभा भैलुमे, हर्षदा काळदाते, माजी नगरसेविका मंगल तोरडमल यांच्यासह पतसंस्थेच्या संचालिका लता जगताप, सविता फलके, पल्लवी थोरात, मोहिनी आखाडे, संगीता जायभाय, पूजा गदादे, राणी गदादे, डॉ प्रिती गदादे, ललिता शिंदे, शाखा व्यवस्थापक गणेश कानडे आदी उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा