न्यु डायमंड इंग्लिश स्कूल मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
कर्जत प्रतिनिधी –
न्यू डायमंड इंग्लिश स्कूल मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला मा.प्राध्यापिका विजया पांडुरंग अनारसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ बडोदाचे शाखाप्रमुख मा.श्री.अनिल जाधवसाहेब ,मा.श्री.अजित खराडे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. दिलीप भाऊ कोठारी, आरोग्य उपकेंद्राचे मा.श्री तुकाराम नागरगोजे,
मा श्री लहुजी लोंढे वस्ताद, श्रिकांत यादव, डॉ, संदीप बळे, अशोक रासकर, अनिल शेठ अनारसे, दत्तात्रय अनारसे, श्रीराम अनारसे, न्युज लाईव्ह महाराष्ट्र/ दर्शन न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक दिलीप अनारसे, सचिन अनारसे, गौतम ठाणगे, बापू पारखे, पै.राहुल लोंढे, शुभम अनारसे, सोन्याचे व्यापारी आनिस सेट सय्यद, बाबासाहेब अनारसे, गणेश अनारसे, नानासाहेब चिंधे, मच्छिंद्र निकत, गोविंद अनारसे, सुभाष यादव, श्रीकृष्ण लावंड, कोरोणा महामारी नंतर हे पहीलेच प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभाव पाडायचा असेल तर आई,वाडीलांनी आपल्या पाल्यांना विश्वासात घेतले पाहिजे.मुलांना चांगले संस्कार शिकवले पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष कोठारी यांनी केले.ते पुढे बोलताना म्हणाले की विद्यार्थीनी लहान वयात मोबाईल चा वापर कमी करावं. मुलांनी पुस्तक वाचण्याकडे व आपल्या शरीर प्रकृती लक्ष केंद्रित करावे.तसेच काही मान्यवरांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आंबीजळगावचे प्रसिद्ध कांदा व्यापारी अशोक शेठ नलावडे यांनी शाळेला फरशी बसवण्यासाठी पाच हजार रुपये रोख स्वरूपात दिले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.विजया अनारसे यांनीही शाळेला जी मदत लागेल ते देऊ शाळेसाठी देणगी देण्याचे आश्वासन दिले, अनिल जाधव साहेब यांच्या व बँक ऑफ बडोदा च्या वतीने मुलांसाठी वह्या पेन आणि खाऊ वाटप करण्यात आले. डॉ, संदीप बळे यांनी सर्वांना रुचकर नाष्ट्याची सोय केली. मुलांना दादासाहेब फरांडे, अंकुश खरात, सर अशोक देशमुख, दिपक धापटे, यांनी मुलांना खाऊ दिला मुलांनी भाषण करून भरपूर मिळाल्यामुळे विद्यार्थी आनंदात होते. मुलांची भाषणे झाली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सह शिक्षक चव्हाण सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सचिव अजित अनारसे यांनी केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा