कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी श्री राजेंद्र माने व सरचिटणीस पदी श्री संदीप काळे यांची निवड…
कर्जत प्रतिनिधी –

दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी महात्मा गांधी विद्यालय कर्जत या ठिकाणी पार पडलेल्या ,कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या सभेमध्ये नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री नानासाहेब सुद्रिक (माजी जिल्हा उपाध्यक्ष जि.मा .शि. संघ) होते. तसेच या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी श्री .पी.बी.बोलगे ,श्री शिवाजीराव ढाळे ,श्री राजेंद्र लांडे सर( सर्व माजी अध्यक्ष जि. मा. शि. संघ), श्री रमजान हवलदार( सरचिटणीस , जिल्हा माध्यमिक,शिक्षक संघ) , श्री भालचंद्र देशमुख( अंतर्गत जिल्हा हिशोब तपासणी जि. मा. शि.संघ) , श्री के .डी .महामुनी, श्री सुंदर दास चव्हाण ,श्री वसंत चटाले , श्री सुधीर काळे, श्री कळसकर , संतोष पोटरे, चंदू बिबे, आजिनाथ बोरुडे आदी मान्यवर तसेच अनेक माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते . सभेचे प्रास्ताविक श्री भालचंद्र देशमुख यांनी केले , उपस्थितांमध्ये सभेस मार्गदर्शन श्री बोलगे सर, श्री ढाळे सर, श्री रमजान हवलदार सर, श्री केडी महामुनी ,श्री चटाले सर यांनी केले. श्री नानासाहेब सुद्रिक सरांनी अध्यक्षीय भाषण केले .यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, अध्यक्ष- श्री राजेंद्र माने, सचिव -श्री संदीप काळे, उपाध्यक्ष -श्री बाजीराव अनभुले ,श्री शहाजी भोसले ,श्री दत्तात्रय जगताप. सहचिटणीस – श्री दिलीप लोंढे ,श्री कल्याण गावडे, श्री रवींद्र पाडूळे. खजिनदार -श्री परशुराम गांगर्डे .हिशोब तपासणीस- श्री बबन खुरंगे ,श्री संजय घोडके .महिला प्रतिनिधी -सौ अर्चना जंजिरे सौ शुक्राणा पठाण. शेवटी श्री अजित वडवकर सर यांनी आभार मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा