गुन्हेगारीब्रेकिंग

जलालपूर आणि भांबोऱ्यासह, बाभूळगाव दुमाला गावांमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर कर्जत पोलिसांची कारवाई..

कर्जत प्रतिनिधी

2 3 4 8 8 2

जलालपूर आणि भांबोऱ्यासह, बाभूळगाव दुमाला गावांमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर कर्जत पोलिसांची कारवाई..


पाच हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त, इतर नष्ट; तिघांवर केला गुन्हा दाखल..


कर्जत प्रतिनिधी –


कर्जत तालुक्यातील अवैध दारूविक्रीवर कर्जत पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरू असून तालुक्यातील विविध भागात कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. आता तालुक्यातील जलालपूर आणि भांबोरा व बाभूळगाव दुमाला या ठिकाणी गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकून 5,620/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
दादा बाळू साळवे (रा.जलालपूर ता.कर्जत) व रेखा राजू माने (रा.भांबोरा ता.कर्जत) नंदकुमार मोहन मावळदकर ( रा बाभूळगाव दुमाला ता.कर्जत )अशी गुन्हा दाखल केलेल्या दारू विक्रेत्यांची नावे आहेत. कर्जत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अचानक छापे टाकून ही कारवाई केली आहे.जलालपूर गावात प्रोव्हिजन गुन्ह्याच्या अनुषंगाने लाला गावडे, दादा साळवे, जनाबाई तांदळे यांच्याकडे दारू मुद्देमालाच्या झडत्या घेतल्या असता दादा साळवे याच्याकडे (इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या) विदेशी सिलबंद दारूच्या बाटल्या मिळून आल्या तर भांबोरा गावात रमेश माने, संदीप माने, रेखा माने यांच्याकडे दारूच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मुद्देमालाची झडती घेतली असता रेखा माने हिच्याकडे गावठी हातभट्टीची तयार दारू व देशी संत्रा कंपनीच्या दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत.
तसेच तसेच बाभूळगाव दुमाला ता.कर्जत येथे इसम नामे नंदकुमार मोहन मावळदकर बाभूळगाव दुमाला ता.कर्जत हा प्रत्र्याचे शेडचे आडोश्याला विनापरवाना बेकायचा देशी दारूची विक्री करीत आहे अशी बातमी मिळाल्याने त्याच्यावर छापा कारवाई केली असता त्याचे कब्जातून देशी संत्रा सागर कंपनीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
त्या अनुषंगाने कर्जत पोलीसांनी तीन दारूविक्रेत्यांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित पोलीस जवान संभाजी वाबळे अर्जुन पोकळे अमोल लोखंडे संपत शिंदे यांनी केली आहे.

*कारवाई सुरूच राहणार..*
मागील महिन्यातही कर्जत पोलिसांनी महिनाभराच्या कालावधीत १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करत तालुक्यातील विविध गावातील तब्बल ३५ अवैध दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले होते. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे