आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

शारदाबाई पवार सभागृहाचे उद्घाटन शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते संपन्न

कर्जत प्रतिनिधी

2 3 4 7 9 2

शारदाबाई पवार सभागृहाचे उद्घाटन शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते संपन्न


कर्जत प्रतिनिधी –

रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मंगळवार दिनांक ,२१ फेब्रुवारी रोजी ‘शारदाबाई पवार’ सभागृहाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. अनिल पाटील होते.प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. खासदार रामशेठ ठाकूर, आमदार निलेश लंके, मा.आ. राहुल जगताप, घनश्याम शेलार हे मान्यवर उपस्थित होते.या समारंभाला प्रमुख उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. दादाभाऊ कळमकर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. श्रीमती मीनाताई जगधने, मा. बाबासाहेब भोस, मा. बाळासाहेब बोठे, ॲड. रवींद्र पवार, एम्. सी. शेख, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष मा. आमदार आशुतोष काळे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव ( उच्च शिक्षण) प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर मा. तुकाराम कन्हेरकर, कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. उषाताई राऊत, माजी विद्यार्थीसंघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, दादा पाटील यांच्या घरातील निर्मला पाटील, सुनंदाताई पवार, शंकर देशमुख, बाजीराव कोरडे, अशोक बाबर, किरण पाटील, अंबादास गारुडकर, माजी सचिव शिवाजीराव भोर, ज्ञानदेव पांडुळे, पोकळे सर, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के, प्राचार्य डॉ. एन एस गायकवाड, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, प्राचार्य डॉ. थोपटे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने व विविध शाखांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य या समारंभासाठी उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब व मान्यवरांना एनसीसी छात्रांकडून मानवंदना देण्यात आली. तसेच मविद्यालयातील विद्यार्थिनींकडून पवार साहेबांसहित सर्व मान्यवरांचे औक्षण करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते शारदाबाई पवार सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन शरदचंद्रजी पवार साहेब व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी रयत गीतासोबत ‘दादा पाटील महाविद्यालय : एक दृष्टीक्षेप’ ही चित्रफीत दाखविण्यात आली.
शारदाबाई पवार सभागृह उद्घाटन समारंभाचे स्वागतपर मनोगत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व आमदार रोहितदादा पवार यांनी केले. स्वागतपर मनोगतात रोहित दादा पवार म्हणाले जामखेड कर्जत तालुक्यातील रयतेच्या विविध शाळांसाठी ज्या दानशुर लोकांनी जागा दिलमहाविद्यालयीन अशांच्या एकत्रित प्रयत्नातून शैक्षणिक कार्य प्रगतीपथावर आहे. शारदाबाई पवार सभागृह सांस्कृतिक, धार्मिक तसेच शैक्षणिक कार्यक्रमासाठी गरजेचे होते. शरद पवार साहेबांच्या प्रयत्नातून आज हे सभागृह पूर्णत्वास आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांनी केले. रयत शिक्षण संस्थेची अहमदनगर विभागातील पहिली शाखा महात्मा गांधी विद्यालय याच्या रूपाने दादा पाटील यांनी सुरू केली. आज उत्तर विभागांमध्ये 134 शाखा व सात महाविद्यालय आहेत. चौथी शिकलेल्या दादा पाटील यांनी शिक्षणाचे रोपटे लावले कर्मवीरांच्या रूपाने दलित मित्र दादा पाटील यांचे कार्य जवळून अनुभवता आले असे राजेंद्र फाळके यांनी नमूद केले.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी शारदाबाई पवार सभागृह हे संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच उभारल्याबद्दल राजेंद्र तात्या फाळके व आमदार रोहितदादा पवार यांचे अभिनंदन केले. रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले आणि सर्वोत्कृष्ट सभागृह असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदी निवड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहितदादा पवार, शारदाबाई पवार सभागृहाचे आर्किटेक्ट श्री.मंदार सिकची, मे बजरंगबली कन्स्ट्रक्शन, थेरवडी प्रमुख श्री. मोहन गोडसे व उत्तर विभाग बिल्डिंग सुपरवायझर श्री.रामचंद्र नलगे यांचा विशेष सत्कार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी उद्घाटकीय मनोगतात जामखेड कर्जत तालुक्यातील रयतसाठी देणगी दिलेल्या सर्व थोर व्यक्तींचे अभिनंदन केले. दुष्काळग्रस्त असणारा कर्जत तालुका आज विकसित होतो आहे. या परिसराचा दुष्काळ पहायला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू हे आले होते. आज या परिसरामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी दर्जेदार सभागृह गरजेचे होते ते आज पूर्णत्वास आले आहे. रयत शिक्षण संस्थेने नेहमीच अद्ययावत व कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व दिले आहे. ऑक्सफर्ड, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम या संस्थांसोबत सामंजस्य करार करून जगातील दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले पाहिजे याकरिता रयत शिक्षण संस्था संस्था प्रयत्न करत आहे. बौद्धिक ज्ञान संपादन करण्यासाठी पाश्चात्य देशांसोबतचे हे करार , रयत शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांकरिता फायद्याचे ठरणार आहेत. दादा पाटील महाविद्यालयाकरिता आप्पासाहेब पवार व , त्यांच्या पत्नीच्या नावे एक कोटीची कायम ठेव ठेवून मिळणाऱ्या व्याजातून दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भविष्यात दिली जाणार आहे. यातील 50 टक्के रक्कम ही मुलींसाठी असणार आहे
शारदाबाई पवार सभागृहाच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रक व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. राजेंद्र तात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व निमंत्रक मा. आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. बप्पाजी धांडे, मा. राजेंद्र निंबाळकर व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय नगरकर, बांधकाम समिती चेअरमन डॉ. संतोष लगड यांनी शारदाबाई पवार सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
शारदाबाई पवार सभागृह उद्घाटन समारंभाकरिता उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व जनरल बॉडी सदस्य, विविध रयत शिक्षण संस्थेच्या शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व आजी माजी विद्यार्थी, पत्रकार बंधूंचे आभार दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती काळे व प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे