शेती पंप चोरणारा कर्जत पोलिसांच्या ताब्यात..
कर्जत प्रतिनिधी –

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेती पंपाच्या मोटरी चोरावर चांगलीच चपराक बसली आहे. कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, वालवड कर्जत रोडने एक इसम मोटरसायकलवर इलेक्ट्रिक मोटर मांडून विक्री करण्यासाठी घेऊन येत आहे आणि ती चोरीची आहे, अशी माहिती मिळाल्याने तात्काळ गून्हे शोध पथकातील पोलीस अमलदार यांना सदर माहिती सांगून कारवाई करणे बाबत कळविल्याने पोलीस अमलदार यांनी दादा पाटील कॉलेज जवळ सापळा लावून सदर इसमास पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पप्पू उर्फ हरिचंद्र दत्तात्रय मांडगे रा. रेहकुरी, असे सांगितले. त्याच्याकडे एक पाच हॉर्सपॉवरची मोटर मिळून आली. त्यास त्याचे ताब्यातील मोटरबाबत विचार पुस केली असता समाधानकारक उत्तरे दिली नाही. अधिक सखोल विचारपूस केली असता पाण्याची मोटर चोरी करून आणल्याचे कबूल केले. त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीचे ताब्यातून एक पाच हॉर्स पॉवर ची मोटर आणि एक मोटर सायकल असा 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार सलीम शेख हे करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला ऑफर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , पोलीस जवान शाम जाधव, पांडूरंग भांडवलकर, गोवर्धन कदम, शकील बेग, यांनी केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा