कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोरवेल मध्ये ऊस तोडणी कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा अडकल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपर्डी वार्ताहर -अमर पठाण
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतकरी काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या बोरवेल मध्ये पाच वर्षाचा मुलगा पडला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ऊस तोडणी कामगारांचा कुटुंबातील एक पाच वर्षाचा मुलगा खेळत असताना शेतकरी काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या बोरवेलमध्ये पडला आहे. सुमारे पंधरा फुटावर तो असून त्याला बाहेर काढण्यासाठी कर्जत तालुक्यात पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे बाहेरून ज्यांना माहिती आहे त्यांनी फोनवरून संपर्क करून मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक गेले असून दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कर्जत पोलिस स्टेशन चे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मुलाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा