कवयित्री स्वाती पाटील स्पंदन साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित..
कर्जत प्रतिनिधी:- दि.१७
आळंदीच्या प्रसन्न वातावरणात उस्फूर्तपणे रंगलेला साहित्य सोहळा, अतिशय प्रेमपूर्वक आणि आपलेपणाने पुरस्कार वितरण सोहळ्याचं केलेलं नियोजन, आदरणीय चांदगुडे सरांसारख्या मार्गदर्शकांच्या हस्ते आणि सर्वच मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत मिळालेला सन्मान नक्कीच माझ्या साहित्य प्रवासाला उभारी देणारा आहे.स्पंदन साहित्य, कला,क्रीडा चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित दुसरे स्पंदन साहित्यप्रेमी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा काल आळंदी येथे संपन्न झाला. पाठ्यपुस्तकातील सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे सर, माजी विशेष अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळकसाहेब, अँड.शैलजाताई मोळक, गझलकार मसूद पटेल, सुप्रसिद्ध कवी सागर काकडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी महेंद्र गायकवाड, वसुंधराताई शर्मा, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, स्पंदनच्या अध्यक्षा सारिका माकोडे, सुप्रसिद्ध हास्यकवी अनिल दीक्षित, कवी, दिग्दर्शक हृदयमानव अशोक, सुनिताताई काटम, सचिन काळे, जितेन सोनवणे, कविता काळे, ज्योती शिंदे, शुभाताई लोंढे, परशुराम लडकत तसेच गझल आणि काव्य क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.सारिका मोडके, प्रशांत भाऊ लाडकत, आदी मान्यवर उपस्थित होते. स्वाती पाटील यांचे संपूर्ण कर्जत तालुक्यात कौतुक केले जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा