अंबिजळगाव च्या शेतकऱ्यांना कुकडीचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे – सरपंच विलास आप्पा निकत
येणाऱ्या काळात कुकडी चे हक्काचे पाणी आगोदर नाही मिळाल्यास पुढे करमाळा तालुक्यात पाणी जाऊ देणार नाही…
कर्जत प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव मधील कुकडी कॅनॉल चे पाणी करमाळा तालुक्याच्या नावा खाली पाण्याचे आवर्तन आहे तोपर्यंत पाणी संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना घेऊन देत नाहीत करमाळा तालुक्याचे आवर्तन पूर्ण झाले की लगेच देण्यात येईल पण जाणीव पूर्वक लगेच मागच्या चाऱ्या ओपन करतात. व फोन लावुन विचारपूस केली असता संबंधित अधिकारी बोलतात आम्हाला आमच्या
वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले प्रमाणेच पाणी सोडण्याचे नियोजन करावे लागते. अंबिजळगाव च्या शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी कुकडीच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत असल्याने हे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना प्रत्येक आवर्तन च्या वेगळी वागणूक देऊन पिळवणूक करतात . करमाळा तालुक्यासाठी आगोदर पाणी जाणार असेल तर मग मागच्या साऱ्या पाणी आल्यापासून सुरू असतात ते पाणी बंद होईपर्यंत सुरूच असतो मग असे का असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांन कडुन पाण्यासाठी पाणी पट्टी आकारण्यात येते परंतु वेळेवर पाणी सोडले जात नाही. म्हणून अंबिजळगाव चे विद्यमान सरपंच विलास आप्पा निकत यांनी येणाऱ्या काळात कुकडी कॅनॉल चे हक्काचे पाणी आगोदर अंबिजळगाव मधील शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अन्यथा कुकडी कॅनॉल चे पाणी करमाळा तालुक्यासाठी पुढे जाऊ देणार नाही याची संबंधित अधिकारी यांनी दखल घ्यावी.आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही पण पाणी पुढे जाणार नाही असे आवाहन केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा