अंबिजळगावचे विद्यमान सरपंच विलास आप्पा निकत यांच्या मागणीला यश….
कर्जत प्रतिनिधी-
कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव मधील शेतकऱ्यांना हक्काचे कुकडी कॅनॉल चे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अधिकारी यांना फोन द्वारे आव्हान केले होते.लगेच कुकडी कॅनॉल च्या अधिकाऱ्यांना लगेच खडबडून जाग आली सोमवारी दुपारी बारा वाजता कुकडी कॅनॉलच्या चाऱ्या फुलदाबाणी पाणी सोडण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून अधिकारी यांना फोन द्वारे असे आवाहन केले होते की अंबिजळगाव मधील शेतकऱ्यांना हक्काचे कुकडी कॅनॉल चे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे.नाहीतर येणाऱ्या पुढील काळात करमाळा तालुक्यासाठी कुकडीचे पाणी पुढे जाऊ देणार नाही असे कर्जत दर्शन न्युज सी बोलताना सांगितले होते.लगेल प्रशासनाने दखल घेत प्रत्येक चारीला पाणी पुर्ण दाबाने सोडण्यात आले शेतकरी वर्गातून सरपंच विलास निकत यांचे कौतुक केले जात आहे. तसेच निकत यांनी अधिकारी यांचे अभिनंदन केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा