कर्जत: या वर्षी पाऊसाचे प्रमाणात चांगले असुन धन धान्याची वृद्धी होईल सदगुरू गोदड महाराज यांच्या संवत्सरीचे वाचन केले.
कर्जत (प्रतिनिधी):-
कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांनी स्वलिखित संवत्सरातील भविष्य लेखनाचे वाचन कर्जत येथील महाराजांच्या मंदिरात करण्यात आले. श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष व पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी सालाबाद प्रमाणे प्रथम दाते पंचागाचे वाचन केले यानंतर श्री गोदड महाराज यांनी स्वत:च्या हाताने लिहून ठेवलेले संवत्सरीचे वाचन करण्यात आले
शोभकृत नावाचे हे संवत्सर असून या संवत्सराचा गुरू हा स्वामी आहे. या वर्षी वायू नावाचा मेघ असल्याने सोसाट्याचे वारे सुटून संकटे उद्भवतील धान्याची धनाची नासाडी होईल, घरांचे नुकसान होईल, वायव्ये कडील देशाची स्थिती चांगली राहणार नाही असे म्हंटले आहे. दरवर्षी अत्यंत सविस्तर निघणाऱ्या भविष्यावर भाविकांची खूप श्रध्दा असल्याने यावेळी परिसरातील भाविक मोठी गर्दी करतात यावर्षी मात्र महाराजांनी लिहून ठेवलेल्या भविष्यवाणी वाचुन दाखवण्यात आली. यावेळी अनिल काकडे यांनी मदत केली तर यावेळी भागवत काकडे, मा, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण दादा घुले, उदय काकडे, संजय काकडे, गोविंद काकडे, हरी काकडे, आदी पुजाऱ्या सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व गुढीपाडव्याच्या, नवीन वर्षाच्या निमित्ताने सदगुरू गोदड महाराज यांच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात द्राक्षाच्या घडांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. सर्वांनी मोठ्याने गजर करत या भविष्य वाचनास सुरुवात झाली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा