डॉ. राजेंद्र पाटील यांचा भाजपात प्रवेश.
कर्जत प्रतिनिधी:-दि.२४

कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे अंबिजळगावचे विद्यमान सरपंच विलास आप्पा निकत यांच्या उपस्थितीत कर्जत तालुका कॉग्रेस आय कमिटीचे सेक्रेटरी डॉ. राजेंद्र प्रतापराव पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला त्याच बरोबर खरेदी विक्री संघाच्या ठरावाचे इच्छुक उमेदवार वैजनाथ निकत, भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका उपाध्यक्ष बापुराव निकत यांनी मनाचा मोठेपणा दाखवून डॉ पाटील यांना पाठिंबा दिला.
सर्व संचालकांच्या सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न करणार व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा, राम शिंदे यांनी माझ्या वर मोठ्या विश्वासाने कामगिरी दिली त्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन सरपंच निकत यांनी दिला. यावेळी शामराव निकत, श्रीराम गायकवाड, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब लोंढे, सुबराव निकत, बापुराव निकत, गोपाळ अनारसे, सागर निकत ग्राम पंचायत सदस्य सुभाष अनारसे, गणेश अनारसे, अजित अनारसे, बिभिषण अनारसे, निजाम शेख, किसन अनारसे, दादासाहेब निकत व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा