ब्रेकिंग
फाटक्या नोटांचा बहाणा करीत शेतकऱ्यास घातला 11हजार रुपयांना गंडा..
ग्राहकांनी खबरदी घेण्याचे आवाहन- शाखाधिकारी जाधव

2
3
4
7
9
2
फाटक्या नोटांचा बहाणा करीत शेतकऱ्यास घातला 11हजार रुपयांना गंडा..
कर्जत प्रतिनिधी:-दि२४
पाचशेच्या बंडंल मध्ये फाटक्या नोटा असल्याच्या बहाणा करुन अंबिजळगाव बॅक ऑफ बडोदामध्ये शेतकरी भरत राऊत यांना शुक्रवारी सकाळी अज्ञात दोन व्यक्तींनी 11 हजार रुपयांचा गंडा घातला. सदरचा प्रकार लक्षात येण्यापूर्वीच त्या दोन भुरट्या चोरांनी बँकेतून धुम ठोकली.
प्राथमिक समजलेल्या माहितीनुसार, भरत राऊत अंबिजळगाव येथील बॅक ऑफ बडोदाच्या शाखेतुन आपल्या बचत खात्यातील 46 हजार रुपयाची रक्कम काढली.
यावेळी शेजारी उभे असलेल्या अज्ञात व्यक्तींनी आपण काढलेल्या नोटांच्या बंडंलमध्ये काही फाटक्या नोटा असल्याचे सांगितले. राऊत यांनी बंडलची तपासणी करीत असताना तोंडास मास्क आलेली अपंग व्यक्ती पुढे येत मी दाखवतो फाटकी नोट असे म्हणत नोटेचा बंडल आपल्या हाती घेतला. यावेळी काही काळ राऊत यांचे लक्ष दुसऱ्या कामाकडे गेले असता सदरच्या अपंग व्यक्तीने नोटेच्या बंडलसह बँकेतून धूम ठोकली. सदरचा प्रकार शाखा व्यवस्थापक अनिल जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये दोन अज्ञात व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे अधोरेखित केले. मात्र त्या दोंघाच्या तोंडास मास्क असल्याने त्यांची ओळख पटने कठीण झाले होते
……………………………………………….
चौकट – ग्राहकांनी रोख रक्कम असताना आवश्यक काळजी घ्यावी – शाखाधिकारी अनिल जाधव