विद्यार्थ्यांनी स्वतःची नकारात्मक मानसिकता बदलावी-डॉ. योगेश बाफना
कर्जत प्रतिनिधी:-
अहमदनगर येथील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन व स्वागत समारंभ उत्साहात पार पडले.
“चांगले विचार व चांगली संगत ठेवून विद्यार्थ्यांनी स्वतःची मानसिकता बदलावी. सकारात्मक विचार करावा. निवडलेल्या क्षेत्रात समाजसेवेचे काम करावे, असे आवाहन डॉ. योगेश बाफना यांनी केले.
नगर येथील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा केला. स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सर्व बी. व डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शशांक आखाडे व शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्व नवीन विद्यार्थ्यांना कॉलेज विषयी माहिती देऊन शिस्त व अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. योगेश बाफना सर, तसेच संस्थेचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केले व आभार प्रा. गणेश कर्डिले यांनी केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा