निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांना फुटली नवीन पालवी.
कर्जत प्रतिनिधी:-दि.२९ मध्यतरी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीनंतर उन्हाचा कडाका पुन्हा एकदा वाढू लागला आहे त्यामुळे उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली असली तरी, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांनी मात्र नवसंजीवनी धारण केली आहे. अशा या कडाक्याच्या उन्हातही निसर्गाकडून सुरू असलेली रंगीबेरंगी फुलांची नजाकत मनाला मात्र गारवा देत आहे.
सध्या चैत्र महिना सुरू झाला आहे. फाल्गुन महिन्यातील झाडांची पानगळ संपली असून सध्या निसर्गाचे नवे रूप समोर येत आहे जणू काही वृक्षांनी नवसंजीवनी पांघरली आहे.पाना – फुलांनी विविध देशी तसेच विदेशी झाडे बहरू लागली आहेत.ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली आहे या ओळीचा प्रत्येक चैत्र महिन्यात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.झाडांनी कोवळी,लुसलुशीत पाने मनाला गारवा देत आहेत कडुनिंब, आंबा, बाभूळ, बेल, तसेच विविध विदेशी वृक्ष नवीन पालवीनी बहरून गेली आहेत.अवसान हरवलेल्या निसर्गाने चैत्राची उधळण करीत बळीराजाला नवी उमेद नवा उत्सव मात्र देऊन जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा