सदगुरू कृषी महाविद्यालयाची गौरी राऊत 21 व्या ॲग्रीयुनिफेस्ट बेंगलोर मध्ये प्रथम
कर्जत प्रतिनिधी:-
मिरजगाव येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास संस्थेच्या सदगुरू कृषी महाविद्यालयची विद्यार्थिनी गौरी राऊत व मयुरी इंगळे यांनी राष्ट्रीय संशोधन परिषद नवी दिल्ली आयोजित कृषी विज्ञान विद्यापीठ बंगलोर येथे 13 ते 17 मार्च दरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ 21 व्या ॲग्रीयुनिफेट 2023 स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघात भाग घेवून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. सदर स्पर्धेमध्ये एकूण 60 विद्यापीठाने आपला सहभाग नोंदविला होता. या प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाला त्यामध्ये दोन बक्षीसे मिळाली.सदगुरू महाविद्यालयचि विद्यार्थिनी गौरी राऊत हिला अक्टप्ले
मध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून तिचा संस्थेचे संस्थापक डॉ.शंकररावजी नेवसे यांच्या हस्ते व कर्पे साहेब संचालक श्री नाथ म्हस्कोबा साखर कारखाना डॉ. पोपटराव मते, मते साहेब, शिंदे साहेब यांच्या उपस्थीत सत्कार समारंभ पार पाडला. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ. शंकररावजी नेवसे,अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, खजिनदार अर्चनाताई गोरे प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, नोडल ऑफिसर अण्णासाहेब रासकर, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, समन्वयक प्रसाद पाटील, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीर सिंग चौहान, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड व सदगुरू कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदांनी या यशाबद्दल विद्यार्थिनींचे अभिनंदन केले असून परिसरात या यशाबद्दल कौतुक होत आहे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा