नांदगाव मधुन आई व मुलगा चार दिवसांपासून बेपत्ता…
कर्जत प्रतिनिधी:-
कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील प्रियंका भाऊ देवकर ही २७ वर्षीय महिला व ७ वर्षांचा मुलगा प्रेम भाऊ देवकर हे दोघे १७ एप्रिल २०२३ पासून बेपत्ता झाले आहेत. पतीने भाऊ सूर्यभान देवकर यांनी कर्जत पोलिस स्टेशन मध्ये स्वता जाऊन फिर्याद दिली आहे. सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली असून ते कुठेही मिळून आले नाहीत. हे दोघे कुठे दिसल्यास 7498601428 या नंबरवर संपर्क करावा. प्रियांका चे वर्णन असे असे आहे – रंग काळा सावळा, उंची ५ फूट, लांब केस, नाक सरळ, उजव्या हाताच्या दंडावर B असे गोंदन काढलेले आहे. तिचा मुलगा देखील तिच्या सोबत घरातुन निघून गेला आहे.प्रेम भाऊ देवकर : रंग गोरा, उंची ३.५ फूट, अंगात काळी पँट व शर्ट घातलेला असुन ते दोघे पण एकाच वेळी घरातुन बाहेर निघून गेले आहेत .जर कोणास आढळून आल्यास कर्जत पोलिस स्टेशन मध्ये संपर्क करा. किंवा वरील नंबरवर संपर्क करा.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा