स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी अशोकजी सुर्यवंशी मुख्याध्यापक यांची नियुक्ती..
जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी दिले नियुक्तीचे पत्र..
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन निरपेक्ष विनामूल्य सेवा देणारी संघटना म्हणजे स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना
जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचे विविध प्रश्न मंत्रालय स्तरापासून सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचीच पावती म्हणून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेमध्ये प्रवेश करत आहेत.
अशी माहिती शिंदे यांनी दिली यावेळी शिंदे यांनी सांगितले की प्रत्येक शिक्षक हा आपले कामे करण्यासाठी सक्षम असतो. परंतु ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात किंवा सामूहिक एखाद्या विषयावर मार्ग काढण्यासाठी संघटनेची गरज असते अशाच परिस्थितीत स्वाभिमानी शिक्षक संघटना त्या शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन कार्य करत आहे
मा.सूर्यवंशी सर यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहेत ते निवेदक आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांच्या अनुभवाचा उपयोग नक्की संघटनेला पर्यायी शिक्षकांना होणार आहे.
श्री. सूर्यवंशी अशोक यांची स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याची समजताच मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक बाजीराव रावजी खांदवे साहेब, जगदीशजी बियाणी साहेब संपादक मराठवाडा साथी , डॉ. प्रभू गोरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष संभाजीनगर, भाटिया सर, साळवे सर तसेच सर्व मित्र परिवाराने अभिनंदनचा वर्षाव केला आहे व पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा