ब्रेकिंगराजकिय

ये बिड्डा…ये मेरा अड्डा.! खेडच्या सोसायटीचा ‘हानुकाका पॅटर्न’ तब्बल बासष्ठ वर्षांनंतरही पॉवरफुलच!

अॅड- विजय सोनवणे

ये बिड्डा…ये मेरा अड्डा.! खेडच्या सोसायटीचा ‘हानुकाका पॅटर्न’ तब्बल बासष्ठ वर्षांनंतरही पॉवरफुलच!


श्री गणेश शेटीबाबा सहकार पॅनलने विरोधी पॅनलचा उडवला ‘धुव्वा’


अ‍ॅड.विजय सोनवणे

राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या खेड सेवा सोसायटीच्या निवडणुकीत श्री गणेश शेटीबाबा सहकार पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे.सोसायटीच्या स्थापनेपासुन तब्बल ६२ वर्षांची विजयाची परंपरा कायम राखत पुढील पाच वर्षांची सत्ताही काबीज करण्यात विजयी पॅनलला यश आले. विरोधी गटाच्या शेतकरी विकास पॅनलला एकाच बिनविरोध जागेवर समाधान मानत इतर बारा जागांवर गुरुवार दि.२८ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली आहे. विशेष म्हणजे खेडची सोसायटी मताधिक्क्याने येणारी तालुक्यातील पहिली सोसायटी आहे. विठ्ठल मोरे व भरत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व उत्तम कायगुडे,गोरख पावणे,शंकरराव मोरे,संजीवन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या फरकाने विजयाची परंपरा यावेळीही कायम राखली.एकूण ८६२ मतांपैकी ८१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर त्यातील ३६ मते अवैध ठरली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एस.डी.पाटील यांनी काम पाहिले तर सचिव आर.एन. काळे, विठ्ठल वाघमारे यांनी त्यांना सहकार्य केले.
विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून: बाबासाहेब हौसेराव मोरे, वसंत एकनाथ साळुंके, प्रदीप काकासाहेब गायकवाड, भरत संभाजी पावणे, पांडुरंग रामभाऊ पावणे, दादा कृष्णा दातीर, चंद्रकांत शामराव कायगुडे,एकनाथ पांडुरंग पाडुळे.
महिला राखीव: अलका सुभाष आगवण, हिराबाई आप्पा कायगुडे.
इतर मागास प्रवर्ग: काशिनाथ रामचंद्र खराडे.
विमुक्त भटक्या मागास प्रवर्ग: मधुकर जगन्नाथ कायगुडे हे उमेदवार विजयी झाले. निकालानंतर सोसायटीच्या आवारात मोठा जल्लोष करत फटाक्यांच्या अतिषबाजीसह गुलालाची उधळण करण्यात आली. सहकार भवन सोसायटीच्या इमारतीसमोर खेड,गणेशवाडी, करमणवाडी,वायसेवाडी आदी गावातील नागरिक एकत्र जमले त्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब मोरे, माजी पं.स.सदस्य रामराजे मोरे
विठ्ठल मोरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाडुळे, गणपत कायगुडे, विजयकुमार कायगुडे आदींनी मतदारांचे आभार मानले.आभार कार्यक्रमानंतर सर्वांनी ग्रामदैवत गुप्तनाथ महाराजांचे दर्शन घेतले.

असा होता ‘हानुकाका पॅटर्न’

१९६० साली लालासाहेब कृष्णाजी मोरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी खेड सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी त्यांचे लहान बंधु तत्कालीन राजकीय नेते हनुमंराव कृष्णाजी मोरे यांनी आपल्या खांद्यावर पेलली. शेतकऱ्याचे हित जपताना कै. हनुकाकांनी गोरगरीब व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मोठे योगदान दिले.गावचा सरपंच ते जगदंबा सहकारी साखर कारखाना संचालक, सोसायटी चेअरमन तसेच तीन वेळा पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषदेला स्विकृत सदस्य ही पदे भूषवत असताना अनेकांना मदतीचा हात दिला.वैयक्तिक जीवनातही त्यांनी केलेल्या मदतीचे अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. सन १९९२ साली एका लग्नसोहळ्यात सोन्याच्या अंगठीसाठी वर रुसला होता.त्यावेळी खेडच्या ‘त्या’ गरीब वधु पित्याकडे पैशांअभावी जावयाचा हट्ट पुर्ण करणे शक्य नव्हते ही बाब हानूकाकांना समजताच त्यांनी आपल्या हातातील अंगठी होणाऱ्या वराच्या बोटात घातली आणि लग्नसोहळा पार पडला. अँबेसिडर ही चारचाकी आलिशान गाडी त्याकाळी खुपच चर्चेत असायची आणि ही गाडी क्वचितच बड्या लोकांकडे असायची. मात्र ही गाडी गोरगरिबांच्या मदतीसाठी २४ तास अविरत उपलब्ध होती. कोणतीही व्यक्ती कामानिमित्त भेटीसाठी जेंव्हा काकांच्या राहत्या घरी येत असत तेंव्हा भोजन केल्याशिवाय तेथून माघारी येणे शक्य नसायचे.असे अनेक प्रसंग कित्त्येक दशकानंतरही निवसणुकीच्या निमित्ताने ऐकावयास मिळतात.

एक जागा झाली बिनविरोध!

शेतकरी विकास पॅनलकडून लक्ष्मण कांबळे तर श्री गणेश शेटीबाबा सहकार पॅनलकडून मारुती कांबळे या सख्ख्या भावंडांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. मात्र मारुती कांबळे यांनी अवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने शेतकरी विकास पॅनलचे लक्ष्मण कांबळे बिनविरोध झाले. मात्र या बिनविरोध जागेची नाट्यमय चर्चा लपुन राहिली नाही.

प्रेशर कुकरने वाजवली अनेकांची शिट्टी!

रविंद्र सर्जेराव मोरे या अपक्ष उमेदवाराने ‘प्रेशर कुकर’ चिन्हावर ८१६ मतांपैकी ८३ मते मिळवली.अपक्ष उमेदवाराला मतदारांनी दिलेल्या मतदानरुपी कौलामुळे अनेकांच्या शिट्ट्या वाजल्या आहेत.अपक्ष उमेदवार कुणाची किती मते खाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे