कोरेगाव मधील लाईट सुरळीत करा – स्वराज शेळके
कर्जत प्रतिनिधी:-
कर्जत तालुक्यातील कोरेगाव मध्ये वारंवार एजी सिंगल फेज, व थ्री फेज लाईटचा घोटाळा होत आहे. थोडासा पाऊस आला की लाईट जाते. शेतकऱ्यांनी काय करायचे पिकांना वेळेवर पाणी कसे द्यायचे. सतत लाईटचा घोटाळा होत असल्यामुळं शेतातील पिकांना वेळेवर पाणी द्यायवे कठीण झाले आहे.
अवकाळी पाऊस पडल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. या अवकाळी पावसाला सामोरे जायचे की महावितरणाच्या लाइटीला समोरे जायचे. मेंटेनेस वाले कामगार येतात एका पोलचे काम करतात आणि दहा पोलचे बिल काढतात.
160050003369 हे माझे कोरेगाव एजी वरती घरगुती कनेक्शन आहे. लाईट असो किंवा नसो तुम्ही दर महिन्याला बिल देता. आपण कोणत्या बेसवर बिल देता असा प्रश्न मी विचारत आहे. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे मिटर चालू आहेत रेगुलर बिल पण भरतात पण त्यांना लाईट कधीच नसते.
महावितरणाचे अधिकारी सिंग यांना खूप वेळा विनंती केली होती. आम्हाला सिंगल फेज लाईट द्या कनेक्शन भरतो. डिपी द्या किंवा किंवा दुसऱ्या डिपी वरून लाईट ओढून द्या. त्यांचा एकच शब्द असतो सध्या कुठलीही स्कीम चालू नाही. स्कीम येणार कधी, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार. कोरेगावचे वायरमन येतात आणि ग्रामपंचायत मध्ये फॅन खाली बसतात.. सर्व वरिष्ट अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून कोरेगाव एजी थ्री फेज व सिंगल फेज सुरळीत चालू करावी. अशी विनंती सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शेळके यांनी केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा