आंबीजळगाव विद्यालयाची खेळाडू पै.हर्षदा मासाळ हिला कुस्ती स्पर्धेत ब्राॅझ पदक…
कर्जत प्रतिनिधी :-
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव मधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना एका ग्रामीण भागातील डोंबाळवाडी येथील गरीब घरातील शेतकरी कुटुंबातील हर्षदा मासाळ हिने आपल्या विद्यालयाचे नाव विद्यालयाचे नाव राज्यस्तरावर उंचावले आहे,
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलुज येथे झालेल्या राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक मिळाल्याने रुरल एज्युकेशन सोसायटी मिरजगाव संचलित न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंबीजळगाव विद्यालयाची खेळाडू पै.हर्षदा मासाळ हिने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित दि. ५ते ७ मे 2023 रोजी अकलूज येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील ५३किलो वजन गटात ब्राँझ पदक पटकावले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए बी चेडे साहेब ,विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब पवार व सर्व शिक्षकांनी तसेच कर्जत तालुक्यातुन अभिनंदन केले जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा