पोलीस नाईक किरण घुटे यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान….
मिरजगाव प्रतिनिधी:-
श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी गावचे सुपुत्र व पुणे शहर पोलीस दलात येरवडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक किरण कचरु घुटे यांना पोलीस दलातील प्रशंसनीय सेवा व उकृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना दरवर्षी 1 मे रोजी पोलीस दलातील उकृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात येते. किरण घुटे हे सन 2006 साली पुणे शहर पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून रुजू झाले.
सध्या ते येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे नियुक्तीस आहेत. त्यांनी सायबर क्राईम, गुन्हे शाखा, खडकी व येरवडा पोलीस ठाणे येथे नोकरी केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चैनचोरी, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, वाहनचोरी, घरफोडी, मोका अशा अनेक गंभीर व संवेदनशिल गुन्ह्रांची उकल करुन, तपासकामी मदत करून गुन्हे उघडकिस आणले आहेत. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील 16 वर्षाच्या प्रशंसनीय सेवेबद्दल व उकृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा