नोकरीब्रेकिंग

प्रा.डॉ.संजय नगरकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड…

कर्जत प्रतिनिधी

2 3 4 8 8 2

प्रा.डॉ.संजय नगरकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड…


कर्जत प्रतिनिधी:-

दादा पाटील महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांची नुकतीच रयत शिक्षण संस्थेच्या ‘लाइफ वर्कर’ मधून ‘मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी’ निवड करण्यात आलेली आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव मा. प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनातून ही सार्थ निवड करण्यात आली आहे.रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय राजेंद्र (तात्या) फाळके यांनी प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना म्हटले की, डॉ. संजय नगरकर यांनी महाविद्यालयामध्ये केलेल्या अनेकविध कामाची पोहोचपावती त्यांना संस्थेच्या पदरूपाने प्राप्त झाली असल्याचे नमूद केले.प्राचार्य डॉ. संजयं नगरकर यांनी महाविद्यालयात प्र.प्राचार्य म्हणून रुजू झाल्यापासून महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमांनी कायापालट केलेला आहे. त्यामध्ये कौशल्य शिक्षण, संशोधन, कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे सतत समुपदेशन, कर्मवीर व्याख्यानमाला, अखिल भारतीय स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन, ४ थे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये सहभाग, ब्रिक्स आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन, विद्यार्थ्यांचा कीर्तन महोत्सव, आयडियाचा आविष्कार उपक्रम, स्वयं अर्थ सहाय्यित कमवा व शिका योजनेचा प्रारंभ, शारदाबाई पवार सभागृहाची परिपूर्ती, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा उभारणी, मुलींच्या वसतिगृहाचे विस्तारित बांधकाम, मुलींसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेसाठी मा. आ. रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने ‘कोपर्डी-शिंदे-नांदगाव ते महाविद्यालय’ या मार्गावर सुरू केलेली महाविद्यालयाची तेजस्विनी बस, विद्यार्थी व प्राध्यापक यांचे जाहीर झालेल्या १५ पेटंटसाठी प्रोत्साहन, २० हून अधिक कौशल्यपूरक कोर्सेसची अंमलबजावणी, ३२ हून अधिक संस्था व कंपन्यांशी सामंजस्य करार, गरीब विद्यार्थी फंडासाठी भरीव आर्थिक तरतूद व अत्यंत गरजू विद्यार्थांना मदत, तसेच हिंदी, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र या विषयांचे पीएच. डी. संशोधन केंद्रे सुरू करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. कला, क्रीडा, संस्कृती, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक आदि सर्व क्षेत्रांकरिता महाविद्यालयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी निभावली आहे.
या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष मा. आ. आशुतोष काळे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. राजेंद्र तात्या फाळके, मा. आ. दादाभाऊ कळमकर, मा. मीनाताई जगधने, मा. बाबासाहेब भोस, मा. बाळासाहेब बोठे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.बप्पासाहेब धांडे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. राजेंद्र निंबाळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाषचंद्र तनपुरे व कार्यकारिणी सदस्य व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवकांनी तसेच मित्र परिवारातील सदस्यांनी प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे