ब्रेकिंग
माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नगर पंचायत मध्ये दीड वर्षात टँकर चालकांना मिळेनात पैसे…
कर्जत प्रतिनिधी

2
3
4
7
9
2
माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नगर पंचायत मध्ये दीड वर्षात टँकर चालकांना मिळेनात पैसे…
कर्जत (प्रतिनिधी):-
कर्जत नगर पंचायत अंतर्गत लावलेल्या झाडांना घातलेल्या पाण्याच्या टँकरचा मोठा घोटाळा झाला असल्याचे पहावयास मिळत असून याकडे कोणीही गांभीर्याने पाहायला तयार नसताना सदर झांडाना टँकरने पाणी घालणाऱ्या टँकर मालकांना मात्र गेली वर्ष दीड वर्षात पैसेच मिळाले नसल्याचा गंभीर प्रकार उघडकिस आला आहे.
महाराष्ट्र राज्यात माझी वसुंधरा स्पर्धेत पहिल्याच वर्षी राज्यात दुसरा क्रमांक व दुसऱ्या वर्षीच्या स्पर्धेत संयुक्त पहिला क्रमांक मिळविणाऱ्या कर्जत नगर पंचायत मधील सर्वात मुख्य असलेल्या हजारो झाडांना पाणी घालणाऱ्या टँकर मालकांना अद्याप त्याच्या कष्टाचे पैसे मिळाले नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कर्जत नगर पंचायतचे तात्कालिन मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी जाने २०२१ पासून कर्जत शहरात सुरू असलेल्या वृक्षारोपनास नियमित पाणी घालण्यासाठी टँकर चालकांना तोंडी दर ठरवून कामाला सुरुवात केली. सदर टँकर चालक नियमित आपले काम करत असताना त्याचे पैसे मात्र वेळेवर मिळत नव्हते त्यामुळे हे टँकर चालक अधून मधून पाणी घालणे बंद करत मात्र वेळोवेळी मुख्याधिकारी जाधव हे या चालकांना विश्वास देत व आपला एक रुपया ही राहणार नाही असे सांगत, मात्र गेली दीड वर्षातील या टँकर चालकांचे पैसेच मिळाले नसल्याने पाणी घालने या लोकांनी बंद केले असून अनेकदा हे लोक नगर पंचायत मध्ये चकरा मारत असून त्यांना कोणीही दाद देत नाहीत, तर मुख्याधिकारी जाधव यांची काही महिन्यापूर्वी बदली झाली असून त्यानंतर येथे मुख्याधिकारी नसल्याने नगर पंचायत च्या कामात ही विस्कळीत पणा आलेला असताना यावर मात्र कोणीही बोलायला तयार नाही.
आ. रोहित पवार यांनी जे कार्यक्षम अधिकारी म्हणून कर्जत तालुक्यात आणले त्यातील मुख्याधिकारी गोविंद जाधव हे एक होते, त्यांनी आपल्या कार्यकाळात काम ही अत्यंत चांगले केल्याचे लोकांना दिसत होते मात्र अंतर्गत अनेक चुकीच्या बाबी जाधव यांनी केल्या असल्याचे सद्या बोलले जात असून याचे एक एक किस्से आगामी काळात समोर येणार आहेत.
मुख्याधिकारी जाधव यांनी टँकर चालकांना पैसे देण्याचा विश्वास दिलेला असल्याने टँकर चालक काम करत राहिले मात्र जाधव याची बदली झाली व त्यांनी संपर्कच तोडून टाकला असून आता ते फोन ही उचलत नाहीत तर नगर पंचायत मध्ये मुख्याधिकारीच नसल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न आहे असे टँकर चालक विठ्ठल नेटके यांनी सांगितले. गेली दीड वर्षात आमच्या कडील फोटो घेतलेच नाहीत त्यामुळे बिल काढले की नाही हे आम्हाला माहीत नाही असेही हे चौघे म्हणत असताना प्रत्यक्षात टँकरचे बिल काढले गेले असल्याचे समजत असून याबाबत नेमकी कोणीही माहिती द्यायला तयार नाही असे नेटके व त्याच्या सहकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.
टँकर चालक विठ्ठल नेटकेसह धनंजय नेटके, गोदड दळवी, सोमनाथ दळवी या चार व्यक्तींनी गेली दोन अडीच वर्षात कर्जत शहरातील विविध बागा व कर्जत शहरात लावलेल्या झाडांना टँकरने पाणी घातले असून स्वत:चे पैशाने डिझेल टाकून त्यांनी काम केलेले असताना त्याच्या कामाचा मोबदला दिला जात नाही ही शोकांतिका आहे.
कर्जत शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन उभारलेल्या सर्व सामाजिक संघटनेने गेली ९५० दिवस मोठ्या कष्टाने श्रमदान करून कर्जत शहरात ७० ते ८० हजार झाडे लावली आहेत. ही झाडे जगण्यासाठी त्यांना नियमित पाणी मिळणे अत्यंत महत्वाचे होते व हेच काम या टँकर चालकांनी केले असून या आधारेच माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात कर्जत नगर पंचायतचा डंका वाजला असताना व यात मोलाची साथ या टँकर चालकांची मिळालेली असताना त्याचा मोबदला मात्र दिला जात नाही याची चौकशी करण्याची गरज असून यामागील मोठे गौडबंडाल पुढे येण्याची शक्यता आहे.
कर्जत शहरात टँकर चालकांनी पाण्याचे पैसे मिळाले नसल्यानेच पाणी बंद केल्यानंतर काही दिवस सर्व सामाजिक संघटनानी नागरिकांकडून पैसे घेत झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न केले, या काळातील टँकरचे पैसे काढले गेले का? यासह नगर पंचायत मधील टँकरच्या पाण्याच्या जादाच्या दराबाबत ही दबक्या आवाजात चर्चा सुरू असून टँकरने येथील बागांना पाणी घातलेले असताना या बागाची अवस्था वाईट असल्याने अशा अनेक मुद्यावर कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याने व कोणीच जाहीर पणे बोलत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चौकट
मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचा कारभार येणार रडारवर….
कर्जत नगर पंचायतला माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला म्हणून ज्या मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना कर्जतकरांनी डोक्यावर घेतले होते, त्याच्या बदलीनंतर मात्र त्याचे एक एक कारनामे पुढे येत असून भविष्यात ते उघडे पडणार आहेत. त्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी आ. राम शिंदे नी विधान परिषदेत केली होती मात्र हा विषय ही मागे पडला असून सध्या जाधव यांच्या तोंडी सुचनेवरून विश्वासाने कामे केलेले अनेक लोक पैसे मिळविण्यासाठी नगर पंचायत मध्ये चकरा मारत आहेत. सर्व सामान्य नागरिकांसह तालुक्याचे एक अधिकारी व काही नगरसेवकांचे ही मोठ्या प्रमाणात नगर पंचायतमध्ये पैसे अडकले आहेत. नगर पंचायतचे कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण नगरसेवक असताना आपलेच पैसे अडकले आहेत, असे कसे म्हणायचे अशी अडचण या नगरसेवकांची झाली असून याशिवाय अनेक छोट्या व्यवसायिकांची बिले अडकल्याने हे लोक अडचणीत आले असून यामाध्यमातून असे लोक जाधव यांच्या नावाने खडे फोडत आहेत.
चौकट – दोन आमदार मात्र नगर पंचायतचे कारभाराकडे दुर्लक्ष…