मिरजगाव (वार्ताहर)
मिरजगाव तिथे राजे छत्रपती संभाजी महाराज जयंती येथील शिवशंभो बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मिरजगाव ग्रामपंचायत सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे , डॉक्टर, अच्युत वीर, असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. विलास कवळे, डॉ. अशोक काळदाते, कर्जत तालुका शिवसेना उपप्रमुख शिवाजी नवले , शिवसेना नेते माजी उपसरपंच अमृत लिंगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संपतराव बावडकर सामाजिक कार्यकर्ते अभिजीत कांबळे, किशोर कोल्हे, ग्रा पं. सदस्य संदीप बुद्धिवंत, सारंग घोडेस्वार, कैलास बोराडे. सह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा चे पूजन डॉ. पंढरीनाथ गोरे ,संपतराव बावडकर, लहानु कोरडे,अमृत लिगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला तर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

सोबत :- मिरजगाव येथे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा चे पूजन करताना डॉक्टर गोरे डॉक्टर कवळे संपतराव वाडकर बावडकर अशोक काळदाते , प्रतिष्ठानचे अध्यक्ष लहानु कोरडे, अच्युत वीर व शिवाजी नवले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा