रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी,साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान शिबीर…
प्रतिनिधी कर्जत दि.१६
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी,साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व कमलाभवानी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कर्जत येथील साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी व साई अद्वैत हॉस्पिटल व कमलाभवानी ब्लड बँक यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी रक्तदान केले तर नेत्र तपासणीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप गदादे,सचिव सचिन धांडे उपाध्यक्ष काकासाहेब काकडे,संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप काळदाते,माजी अध्यक्ष प्रा.विशाल मेहेत्रे,इंजि. रामदास काळदाते,माजी सचिव राजेंद्र जगताप,घनश्याम नाळे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.मनोजकुमार कापसे,व्हा. चेअरमन डॉ.अद्वैत काकडे,नितीन देशमुख,रवींद्र राऊत,दयानंद पाटील,उपमन्यू शिंदे,गणेश जेवरे,प्रसाद ढोकरिकर,राहुल खराडे,अमित देशमुख, विनोद खाटेर,आदींसह हॉस्पिटल आणि ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रोटरी क्लब ही एक सामाजिक भान जपणारी आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक काम करणारी संघटना असून रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबविले जातात.याचाच एक भाग म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. असे माजी अध्यक्ष प्रा.विशाल मेहेत्रे यांनी यावेळी सांगितले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा