ब्रेकिंग

सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं हे तुमचं – आमचं कर्तव्य – आमदार प्रा.राम शिंदे

कर्जत-जामखेड मतदारसंघ : खरीप हंगामपुर्व नियोजन व आढावा बैठक चोंडीत संपन्न

2 3 4 7 9 2

 

सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं हे तुमचं – आमचं कर्तव्य – आमदार प्रा.राम शिंदे


कर्जत-जामखेड मतदारसंघ : खरीप हंगामपुर्व नियोजन व आढावा बैठक चोंडीत संपन्न


कर्जत प्रतिनिधी :
आगामी खरिप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळवताना कुठेही अडचण येऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. काही अडचणी असतील तर त्या मला सांगाव्यात, त्यावर तात्काळ मार्ग काढला जाईल. खरिप हंगाम नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना दिलासा देणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हे आपले ध्येय आहे. सरकारच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे,असे प्रतिपादन आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले.कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांच्या खरीप हंगामपुर्व नियोजन व आढावा बैठक बुधवारी जामखेड तालुक्यातील चोंडी येथील सभागृहात पार पडली. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.यावेळी जामखेड तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर व कर्जत तालुका कृषि अधिकारी पद्मनाथ मस्के यांनी आढावा सादर केला. दोन्ही तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर आमदार प्रा.राम शिंदे बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी गंगाराम तळपाडे,तहसीलदार गणेश जगदाळे,तहसीलदार योगेश चंद्रे, कुकडी पाटबंधारे प्रकल्प कोळवडी येथील कार्यकारी अभियंता धायगुडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर,तालुका कृषि अधिकारी पद्मनाथ मस्के, पंचायत समिती कृषी अधिकारी रूपचंद जगताप,पंचायत समिती कृषि अधिकारी अशोक शेळके, सीना प्रकल्प उपअभियंता शेळके, महावितरणचे योगेश कासलीवाल, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, उदय पवार, सुनिल यादव, गणेश पालवे, शेखर खरमरे, पप्पुशेठ धोदाड, सरपंच राजेंद्र ओमासे सह आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे पुढे म्हणाले, खरिपपुर्व हंगामासाठी कृषि व इतर विभागांनी जे नियोजन केलं आहे, ते अतिशय काटेकोरपणे दोन्ही तालुक्यात राबवावे. कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधा. कृषि संबंधित कोणताही मोठा शास्त्रज्ञ आपल्या भागात आणायचा असेल तर आपण आणू, महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी संलग्नित हळगावचे कृषि महाविद्यालय यंदापासून सुरू झाले आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.शेतकऱ्यांना योग्य त्या वेळी सुचना आणि खत आणि बियाण्यांचा पुरवठा झाल्यानंतर शेतकरी चांगल्या पध्दतीने उत्पादन घेऊ शकतो.
शिंदे म्हणाले की, मागील तीन वर्षांत शेती अवजारांचे वाटप झाले नाही, मागेल त्याला शेततळे योजना होती. ही योजना आपल्या सरकारने पुन्हा सुरू केली. फुंडकर साहेबांच्या नावाची योजनाही पुन्हा सुरू झाली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या अनुदानात वाढ झाली आहे. या योजनेच्या प्रस्तावांना तालुकास्तरीय समिती मंजुरी देत आहे. सीना, घोड, कुकडीचे आवर्तन नियमित सोडण्यासाठी आपण सतत सरकारकडे पाठपुरावा करत असल्यामुळे आवर्तन वेळेवर सोडले जात आहेत. मागील तीन वर्षांत ज्या प्रमाणात अपेक्षित होतं तसं आवर्तन मिळत नव्हतं, असं म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

चौकट -:- शेतकऱ्यांना कृषि सेवा केंद्रातून कोणतं औषध? कोणतं खतं? कोणतं कीटकनाशक ? जी देणं आवश्यक आहे ते आपल्या स्तरावरून द्यावं. खते, बियाणे, कीटकनाशके यांची विक्री करताना जास्त पैसे घेऊ नका, माझं कोणतही प्रोडक्शन नाही, त्यामुळं मी बळजबरी करून तुमच्या कृषि सेवा केंद्रात काही विकायला ठेवेल, अशी अजिबात शक्यता नाही, असे म्हणत आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

चौकट:- कृषी विभागाच्या वतीने महाडीबीटी पोर्टल वरील विविध योजनांमधून निवड झालेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व कृषी अवजारांचे आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच काही शेतकऱ्यांना सामूहिक शेत तलाव पूर्व संमती पत्र हस्तांतरीत करण्यात आले. राज्य शासनाच्या कृषि योजनेतून पात्र लाभार्थ्यांना शेती अवजारे उपलब्ध होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे