शालेय विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्या मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.
कर्जत प्रतिनिधी,दि.१९
वार्षिक परीक्षा संपून परीक्षांचे निकालही जाहीर झाले आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंद लुटताना दिसत आहेत.दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये क्रिकेट कबड्डी,सुरफाट्या, गोट्या, विटु दांडु, पोहणे यासारखे विविध खेळ खेळून मुले आनंद लुटत असताना दिसत आहेत परंतु, यावर्षी कडाक्याच्या उन्हामुळे दुपारच्या वेळेत बहुतांश खेळांना ब्रेक बसला आहे.घरातील ज्येष्ठ मंडळी मुलांना वाढत्या उन्हात खेळण्यापासून रोखत असल्याने मुलांचा हिरमोड होत आहे. घरात बसूनच मुलांना उदास होत असल्याने अनेक मुले कॅरम, सापशिडी, व टिव्ही वरील विवीध मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याबरोबरच मोबाईलवरील बैठे खेळ खेळण्यात मग्न झाले आहेत. बाहेर कडाक्याचे ऊन असल्याने क्रिकेट सारखे खेळ मनात असूनही खेळता येत नाहीत.
आत्ताचे जग हे माहिती आणि तंत्रज्ञान विकसित असलेल्या जग असताना ग्रामीण भागात मात्र आजही काही जुने पारंपरिक खेळ खेळले जात आहेत. वाढत्या उन्हामुळे मैदानी व पारंपारिक खेळाकडे मुलांनी पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे परंतु बैठया खेळांना मात्र पसंती मिळत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा