आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवास प्रारंभ…

कर्जत प्रतिनिधी

2 3 4 8 6 5

दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवास प्रारंभ…


कर्जत प्रतिनिधी:-

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची स्थापना दलितमित्र दादा पाटील यांच्या प्रेरणेतून जून १९६४ मध्ये अवघ्या ९५ विद्यार्थ्यांवर सुरू झाली. आज महाविद्यालयात पाच हजाराच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागात असणारे पुणे विद्यापीठातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाची ओळख निर्माण झालेली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते हवेत ६० फुगे सोडून दादा पाटील महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवास प्रारंभ झाला. याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये या कॉलेजमध्ये ७५ हजार पेक्षा अधिक सामान्य कुटुंबातील मुला-मुलींनी शिक्षण घेतले आहे. अशा या महाविद्यालयाच्या वास्तूने युवकांना स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली आहे. कॉलेज उभारणीसाठी अनेकांनी त्याग केलेला आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी या कॉलेजने उपलब्ध करून दिल्याने याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
हीरक महोत्सवी वर्षांमध्ये महाविद्यालयामध्ये अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम वर्षभर यशस्वीपणे राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये कर्मवीर व्याख्यानमाला, स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलन, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन, विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन, कर्मवीर जीवनदर्शन व प्रदर्शन, बोलकी झाडे उपक्रम, ६० वीर माता व वीर पत्नींचा सन्मान, ६० वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन, हवामान अंदाज केंद्राचे पुनरुज्जीवन, मुलींच्या विस्तारित वसतिगृहाचे उद्घाटन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी प्रोत्साहन असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येणार आहेत.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब् धांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, प्रसाद ढोकरीकर, बाळासाहेब साळुंखे, विजयनाना मोढाळे , रज्जाक झारेकर, गणेश जेवरे, विशाल म्हेत्रे, बाळासाहेब रानमाळ, लालासाहेब शेळके, मोहन गोडसे, देविदास खरात, नितीन धांडे, विलास धांडे, भूषण ढेरे, तात्या ढेरे, माजी विद्यार्थी संघटनेचे खजिनदार प्रकाश धांडे व सर्व माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे