आरोग्य व शिक्षणनोकरीब्रेकिंग

अंबिजळगावचे सुपुत्र स्वप्निल लोंढे याची पि एस आय पदी निवड…

कर्जत प्रतिनिधी

2 3 4 8 6 5

अंबिजळगावचे सुपुत्र  स्वप्निल लोंढे याची पि एस आय पदी निवड…


कर्जत प्रतिनिधी:-


कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील कांतीलाल छगन लोंढे यांच्या मुलाने वडीलांच्या कष्टाचे केले समाधान. वडील कांतीलाल हे एक सायकलवर भंगार गोळा करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची धरपड पाहून आदर्श घेण्याचे उदाहरण आहे. तर आई गृहिणीचे काम करून घराचा प्रपंच चालवणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेल्या स्वप्निल लोंढे याने परिस्थितीवर मात करून पीएसआय होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. अंबिजळगाव मधील अंबिजळगाव ग्रामस्थांच्या वतीने स्वप्निल लोंढे त्याचे वडील कांतीलाल लोंढे आणि आईचा सत्कार करण्यात आला. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या या स्वप्निल याने परिस्थितीवर मात करून पीएसआय होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केले आहे .घरी अठरा विश्व दारिद्र्य.. आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. शिकून मोठं व्हायचं आपल्या अंगावर पोलिस ची वर्दी घालायची अशी स्वप्न या घरातील तरुणाने पाहिले. आई-वडिलांसोबत कामात तर मदत केलीच तसेच अभ्यासाची आवड असल्याने खेळला वेळ देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली.काही करण्याची इच्छा असेल तर त्याच्या स्वप्नांना कोणीही रोखू शकत नाही हेच स्वप्निल लोंढे यांनी दाखवून दिला आहे. याची पी एस आय पदी निवड असून या निवडीमुळे त्याच्या आई-वडिलांना आपल्या मुलाचा सार्थ अभिमान आहे त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज आपल्या मुलाच्या परीक्षेमधून मिळालेल्या यशातून पूर्ण झाल्या असल्याच्या भावना स्वप्निल च्या वडिलांनी बोलून दाखवल्या.खाकी वर्दी अंगावर असावी असं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने गरिबीशी लढत आणि खेळात सातत्य राखून स्वप्निल लोंढे याने आकाशाला गवसणी घातली आहे.काबाडकष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणं, हे नक्कीच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बबन रासकर, बजरंगवाडी बजंगे बापुराव, कोरेगाव चे ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव, विद्यालयाचे माजी प्राचार्य दत्तात्रय भांडवलकर, अभिमान आबा निकत, माजी सरपंच राहुल अनारसे, डॉ, राजेंद्र पाटील, बाबुराव निकत, गावचे पोलिस पाटील बिबिषन अनारसे, श्रीराम गायकवाड, विजुभाऊ बुरुडे, डॉ, राजेंद्र अनारसे, संतोष गायकवाड, अॅड नितीन लोंढे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम निकत, किशोर निकत, गावातील युवातरुण वर्ग मित्र परिवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,गावातील पहिला मागासवर्गीय मधुन पि एस आय झाल्याने गावाला मोठा अभिमान वाटतो आहे.गावातील तरुण युवकांसाठी अभ्यासाला अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असे प्रतिपादन भांडवलकर यांनी सांगितले तसेच स्वप्निल लोंढे यांच्या पुढील कार्यासाठी डॉ राजेंद्र पाटील व सुदाम निकत यांनी देखील शुभेच्छा दिल्या,
एका अधिकार्याचा बाप होण्याचं स्वप्न असेल तर मुलांवर चांगले संस्कार करा असं कांतीलाल लोंढे यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रत्येकाच्या घरात अधिकारी तयार करायचा असेल तर पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे स्वप्निल लोंढे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
कार्यक्रमाचे आभार माजी सरपंच राहुल अनारसे यांनी मानले.
3.3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे