भाजपने आ. रोहित पवार यांचा निषेध करत काढला मोर्चा.
कर्जत (प्रतिनिधी):-
कर्जत येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या एकेरी भाषेतील वक्तव्याचा तीव्र निषेध करत कर्जत पोलीस स्टेशन मध्ये निषेधाचे निवेदन दिले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.
मुंबई येथे आ. रोहित पवार यांनी काल आपल्या वक्तव्यात आ. राम शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत तुझ्याकडे बघून घेतो अशी भाषा वापरून प्रसिध्दीच्या हव्यासापोटी आपल्या घराण्याला व संस्काराला न शोभणारे वक्तव्य केले आहे. याचा निषेध करत भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह बाजारतळ येथील कार्यालयापासून निषेध मोर्चा काढत कर्जत पोलीस स्टेशनला निवेदन दिले. यावेळी पोलीस उप निरीक्षक भगवान शिरसाठ यांनी निवेदन स्वीकारले या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, सहकार बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या याप्रसंगी भाजपा नेते अशोकराव खेडकर, दादा सोनमाळी, अल्लाउद्दीन काझी, सुनील यादव, अभय पाटील, काकासाहेब धांडे, मंगेश पाटील, राहुल निंबोरे, दत्तात्रय शिपकुले, शरद म्हेत्रे, अनिल गदादे, काका ढेरे, प्रियेश सरोदे, यश बोरा, वाल्मीक साबळे, धनु आगम, जोगबापू बजंगे, आदी सह अनेक जण उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा