माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नातून व्हरकटवाडा जि.प.प्राथमीक शाळेत इंटरऍक्टिव्ह पॅनल भेट….
कर्जत प्रतिनिधी:-
माजी मंत्री.आमदार मा. प्रा.राम शिंदे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्हरकटवाडा,चिंचोली काळदात येथील शाळेस इंटरऍक्टिव्ह पॅनल मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आज दिनांक 25 /7/3023 रोजी सुपूर्द करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते व विद्यमान जिल्हा बँकेचे संचालक अंबादासजी(बप्पाजी)पिसाळ,तसेच किसान मोर्चा भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री सुनील (काका )यादव,चिंचोली काळदात चे उपसरपंच श्री गणेशजी काळदाते,भाजपा वैद्यकीय आघाडीचे तालूका अद्यक्ष नंदलाल काळदाते, देविदास काळदाते,श्री गोदड तांबे,रमेश व्हरकटे ,परशुराम व्हरकटे , धनंजय काळदाते,अनिल मंत्री,शहाजी व्हरकटे ,संपत काळदाते, बापूसाहेब व्हरकटे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सर्जेराव व्हरकटे गेणाभाऊ व्हरकटे,अविनाश व्हरकटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बप्पाजींच्या वाढदिवसानिमित्त वह्याचे देखील वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना चिंचोली गावचे उपसरपंच श्री गणेशजी काळदाते यांनी शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागासाठी ही अत्याधुनिक प्रणाली उपलब्ध करून दिल्याबद्दल शिंदे साहेबांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
यावेळी शाळेचे शिक्षक श्री रामचंद्र खोत सर यांनी प्रास्ताविक केले तर श्री तात्यासाहेब तोरडमल सर यांनी आभार मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा