नोकरीब्रेकिंग

श्रीमती खराडे मॅडम यांचा स्नेहालयाला 21 हजार रुपये देणगी देऊन सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न!

श्रीगोंदा प्रतिनिधी

2 3 4 8 6 5

श्रीमती खराडे मॅडम यांचा स्नेहालयाला 21 हजार रुपये देणगी देऊन सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न!


श्रीगोंदा प्रतिनिधी


श्रीगोंदा येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती खराडे मंगल रामभाऊ यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ रविवारी 6 ऑगस्ट रोजी स्नेहालय या ठिकाणी संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी श्री नानासाहेब पवार हे होते. मुख्याध्यापिका श्रीमती खराडे मॅडम यांनी याप्रसंगी स्नेहालय या संस्थेला 21 हजार रुपये रोख व विद्यार्थ्यांना शब्दबाग हे पुस्तक आणि लेखन साहित्य वाटप करून आपला सेवापूर्ती कार्यक्रम अविस्मरणीय केला. यावेळी श्रीमती खराडे मॅडम यांची विद्यार्थिनी पूर्वा रणसिंग हिने मॅडमने आम्हाला कसे घडविले याचे सविस्तर वर्णन केले. तिचे भाषण ऐकून उपस्थित सर्वांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नानासाहेब पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये खराडे मॅडम चे वडील हे माझे शिक्षक होते. ते आमच्या गावी शिक्षक असताना सर्व मुलांना शिकवण्यासाठी किती कष्ट घ्यायचे याची माहिती सांगितली. ज्या गावात आजही एसटी बस जात नाही अशा गावात 36 वर्षांपूर्वी मॅडमचे वडील शिक्षक म्हणून आले, त्या गावातील एकही विद्यार्थी त्यांनी त्या काळात शाळाबाह्य ठेवला नाही. त्यांनी मुलांना दर्जेदार शिक्षण दिले त्यामुळेच मी अधिकारी झालो. तसेच माझ्या गावातील अनेक मुले अधिकारी झालेले आहेत यात मॅडमचे वडील खराडे गुरुजी यांचा वाटा आहे. त्यांचा वारसा घेऊन खराडे मॅडम यांनीही अनेक विद्यार्थी घडविले आहेत. यावेळी आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी श्री बाबासाहेब खराडे यांनी लहानपणीपासून तर आज पर्यंत खराडे मॅडमचा प्रवास आपल्या भाषणातून मांडला. या कार्यक्रमास इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर, श्रीगोंदा मुले शाळेचे मुख्याध्यापक श्री आर टी साबळे, श्री दातीर सर, श्री समीर गायकवाड, श्री दिलीप खराडे, डॉक्टर शुभांगी फुलसुंदर, सरला गावडे मॅडम, डॉक्टर कल्याणी मेहेत्रे, सीमा साळवे मॅडम, माजी मुख्याध्यापिका निंबाळकर मॅडम, डॉक्टर परिमल फुलसुंदर, कल्पना मोहोळकर मॅडम, कोकाटे मॅडम, सरस्वती खराडे मॅडम, अनामिका गाडीलकर, प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रेय मेहेत्रे यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लोकांना बोलताना श्रीमती खराडे मॅडम यांनी आपली वडील आणि सासरे यांनी नोकरी करीत असताना कसे पाठबळ दिले याविषयी सांगितले. तसेच पती श्री राजाराम मेहेत्रे यांनी नेहमीच पाठबळ दिल्यामुळे मी छत्तीस वर्षे नोकरी करू शकले. तसेच कुटुंबातील सर्व नातेवाईकांनी ही मला खूप मोठे पाठबळ दिल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास अरुण शिंदे, लप घोडके, अशोक राऊत, कुलांगे मॅडम, ओटी मॅडम, हराळ मॅडम, शिंदे मॅडम, घोडेकर सर, रोहिदास डोके सर, शैला फुलसुंदर,इब्टाचे माजी राज्याध्यक्ष ज्ञानदेव खराडे सर यांच्यासह शिक्षक ,स्नेहालयाचे विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार श्री राजाराम मेहेत्रे यांनी मानले .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश सोनवणे यांनी केले.
1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे