चित्रकला स्पर्धेत ऐश्वर्या शिरवाळेचे उल्लेखनीय यश…
श्रीगोंदा प्रतिनिधी –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,श्रीगोंदा शुगर ता. श्रीगोंदा या शाळेतील विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या हर्षल शिरवाळे हिने केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.स्पर्धेत जवळपास 650 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.ऐश्वर्याला चित्रकलेची आवड असून तिचे अभ्यासातही सातत्य आहे. यापूर्वी देखील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तिने भरघोस असे यश मिळवलेले आहे. ऐश्वर्याला या यशात तिचे वर्गशिक्षक मा. रविंद्र होले सर व तिचे आईवडील हर्षल शिरवाळे आणि अमृता शिरवाळे तसेच आजोबा समाजभूषण दादासाहेब शिरवाळे आजी शारदा शिरवाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ऐश्वर्याच्या या यशाबद्दल श्रीगोंदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. अनिल शिंदे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. निळकंठ बोरुडे साहेब, लिंपणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा. विजय लंके, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. पद्मा शिर्के मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. प्रदीप कोकाटे, उपाध्यक्ष मा.दत्तात्रय घालमे, सर्व सदस्य तसेच शाळेतील शिक्षक मा. हिरवे सर, डोंगरे मॅडम, पाचांगणे मॅडम, गवळी मॅडम, पऱ्हे मॅडम , पत्रकार उज्वला उल्हारे ,संपादक मेजर भिमराव उल्हारे ,आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे ,जिल्हा सचिव अर्जुन उल्हारे ,पत्रकार मयूर नवगिरे , खादी ग्रामउद्योगच्या चेअरमन संध्याताई ससाने ,नागवडे दूध संघाचे संचालक विनायक ससाने सर , बहुजन रयत परिषद संपर्क प्रमुख बापूसाहेब गायकवाड आदींनी विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा