रविंद्र अनारसे यांची माळी महासंघातर्फे युवा उद्योजक आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड…
कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष युवा उद्योजक रविंद्रअनारसे यांची माळी महासंघातर्फे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या वेळी माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले,
यांच्या हस्ते अहमदनगर येथे नुकतेच अनारसे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.तसेच शहर अध्यक्ष नितीन डागवाले, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष नंदकुमार नेमाणे, कर्जत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मोतीराम शिंदे, हणुमंत गणगे, आदी मान्यवर उपस्थित होते, संजिवनी उद्योग समुहांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथे त्यांनी संजीवनी मल्टिस्टेट पत संस्था मर्यादितच्या दोन शाखा आहेत.
त्याच बरोबर राधेश्याम मंगल कार्यालय, संजिवनी दुध डेअरी आणी आता नव्याने सुरू केलेल्या नायरा कंपनीच्या प्रशस्त पेट्रोलियम सर्वेसर्वा रविंद्र अनारसे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी ठाकरे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अरुण तिखे व नगर दक्षिण विभागाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ बनकर यांच्या सुचनेनुसार अनारसे यांना निवडीचे पत्र दिले.तसेच डॉ राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, डॉ, संदीप बळे, सत्तर शेख,मोज बागवान, अंबिजळगाव मध्ये कर्जत दर्शन न्युज लाईव्ह चे संपादक व माळी महासंघ जिल्हा अध्यक्ष पत्रकार आघाडी दिलीप अनारसे यांच्या वतीने रविंद्र अनारसे यांच्या निवडी बद्दल फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा