आण्णा भाऊ साठे दिड दिवस शाळेत जाऊन साहित्य रत्न होऊ शकतात मग आपण बारा वर्षे शाळेत जाऊन एक आदर्श व्यक्ती का बनवु शकत नाही.– तृप्ती ऊकिर्डे (बालव्यायाती)वय ११वर्ष
कर्जत प्रतिनिधी-
अंबिजळगाव मध्ये साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त साहित्य दिंडी चे आयोजन करण्यात आले होते.पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन ती दलितांच्या श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.आण्णा भाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे. डॉ.बाबासाहेब. छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा फुले या सर्व समाज सुधारक यांचे विचार प्रत्येकांनी आत्मसात केले पाहिजे.
असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रविंद्र दवणे यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व प्रथम साहित्य दिंडीचे गावातुन मिरवणूक काढण्यात आली. त्यात प्रमुख आकर्षण म्हणजे मर्दानी खेळाची कसरती चा खेळ करुन दाखवण्यात आला. तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आण्णा भाऊ साठे तसेच सर्व महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.लांडगे हे होते तर प्रमुख पाहुणे व्याख्याते रविंद्र दवणे, तसेच बाल व्याख्याते सुरज दवणे. लांडगे सर . नवनाथ नाना केंदळेसर. डॉ राजेंद्र पाटील, किशोर भाऊ निकत, डॉ राजेंद्र अनारसे, राहुल लोंढे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम निकत, कांतीलाल लोंढे, तर प्रमुख उपस्थिती लहुजी वस्ताद लोंढे, गोपाळ अनारसे, गावचे माजी उपसरपंच देविदास चव्हाण,
अजित अनारसे, गणेश अनारसे, संजय लोंढे, माणिकराव लोंढे, पोपट लोंढे,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब लोंढे सर यांनी केले.
तुमच्या कडे जर दोन रुपये असतील तर एक रुपाची भाकरी घ्या आणि एक रुपायाचे पुस्तक घ्या भाकरी उपाशी राहू देणार नाही आणि पुस्तक आडणी राहु देणार नाही.पण विद्यार्थ्यांनी भाकरी पेक्षा पुस्तकाला म्हत्व द्यावे.(बाल व्याख्याता) याने देखील आपले मनोगत व्यक्त केले. 
आण्णा भाऊ साठे दिड दिवस शाळेत गेले तर ते साहित्य रत्न होऊ शकतात आपण तर बारा वर्षे शाळेत जाऊन एक आदर्श व्यक्ती का बनवु शकत नाही. गरुडा सारखे आकाशात उडायचे असेल तर कावळ्याच्या विचार करु नये.बालव्याख्याती तृप्ती ऊकिर्डे हीने सर्वाचे लक्ष वेधून घेत आपले मनोगत व्यक्त केले.या लहान मुलांना बक्षिसांचा खूप वर्षाव झाला. अॅड नितीन लोंढे यांनी कार्यक्रमाच्या वेळी ते म्हणाले की पुढे जयंती नाचुन नाही तर वाचुन करु असे म्हणत कार्यक्रमाचे आभार मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा