नूतन प्राथमिक,माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा…
मिरजगाव प्रतिनिधी –
मिरजगाव येथील नूतन प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांनी मिळून अतिशय उत्साहात साजरा केला. विद्यालयातील प्रत्येक मुलीने प्रत्येक मुलाला राखी बांधली, त्याचबरोबर प्रत्येक मुलाचे औक्षण देखील केले. त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षिका यांनी देखील विद्यालयातील शिक्षकांना राखी बांधून औक्षण केले. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी अशोक यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाविषयी माहिती सांगितली, सणाचे महत्त्व पटवून सांगितले. प्रत्येक सण साजरा करत असताना त्या पाठीमागे रूढी परंपरा त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन देखील असतो. या सणांच्या माध्यमातून आपुलकी,माया, प्रेम, एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला जातो. वर्षभरामध्ये आपण विविध प्रकारचे सण साजरे करत असतो त्याचे कारण हेच आहे की सर्वत्र बंधूभावना दृढ व्हावी प्रत्येकाने इतरांबद्दल आदर व्यक्त करावा, सणाचे महत्त्व समजून घ्यावे. प्रत्येक धर्मियांचा सण उत्सव प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकामध्ये एकीची, आपुलकीची भावना निश्चितपणे निर्माण होईल.
या छानशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निंबाळकर सर यांनी केले यावेळी शेख इजाज, हिंगणे संदीप, शरद शिंदे, चव्हाण सुरज, सुपेकर मॅडम या सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय छान केले. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने श्री निंबाळकर सर यांनी रक्षाबंधनावर आधारित एक छानशा हिंदी गीताचे बासरी वादन सादर केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार श्री शिंदे शरद यांनी केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा