रिमझिम पावसात माळंगी गावात दहीहंडी उत्सव….
कर्जत प्रतिनिधी –
कर्जत तालुक्यातील माळंगी गावात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रिमझिम पावसात डिजेच्या तालावर नाचत गोविंदानी दहीहंडी चा उत्सव साजरा केला. श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात जन्म उत्सव अंबिजळगाव मधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, न्यू डायमंड इंग्लिश स्कूल मध्ये देखील दहीहंडी उत्सव लहान मोठ्या मंडळींनी मोठ्या आनंदात साजरा करण्यात केला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प. पु. प. महंत श्री हिंगोलीकर बाबा महानुभाव माळंगी.
प. पु. प. महंत श्री दत्तराज बाबा महानुभाव भोसे. करमाळा,
अखिल विश्व महानुभाव परिषद, प्रचार मंत्री.
प. पु. प. महंत श्री विजयराज बाबा लासुरकर, आघी ता, जामखेड, कर्जत चे पै. सचिन भैय्या घुले पाटील. श्री कृष्ण मित्र मंडळ माळंगी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दहीहंडी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा