गुन्हेगारीब्रेकिंग

वारंवारच्या मानसिक त्रासाला कंटाळून महिला शिक्षकेची आत्महत्या..

कर्जत प्रतिनिधी-

 

 वारंवारच्या मानसिक त्रासाला कंटाळून महिला शिक्षकेची आत्महत्या..


कर्जत प्रतिनिधी : दि १४


वारंवारच्या मानसिक त्रासाला कंटाळून प्राथमिक शिक्षकेची आत्महत्या झाली असल्याची घटना कर्जत शहरात उघडकीस आली. याबाबत मयत शिक्षकेच्या पतीच्या फिर्यादीवरून संतोषकुमार किसन खंडागळे याच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कर्जत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला शिक्षकेला वरील आरोपीने माहे एप्रिल २०२१ ते १२ जुलै २०२२ अखेर वेळोवेळी फोन करून तसेच प्रत्यक्षरित्या तू मला खूप आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझीच आहेस. तू तुझ्या पतीला सांगायचे नव्हते. तू पुन्हा कोणाला सांगितले तर मी तुझ्या पतीला मारून टाकीन. मी तुला सुद्धा सोडणार नाही. तसेच तुझे फोटो सोशल मीडियावर तुझा चेहरा आणि त्याच्या खाली कोणाचेही शरीर असे फोटो प्रसारित करील. तुझी बदनामी करेल असे म्हणून वारंवार मानसिक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत शिक्षकेचा पती अशोक नामदेव नेवसे याने संतोषकुमार खंडागळे याच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार कर्जत पोलिसांनी आरोपी खंडागळे याच्याविरोधात गुरंन ५०८/२०२२ भादवी कलम ३०६, ३५४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे हे करीत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे