ब्रेकिंग

कला,लेखन माणसाला अमर बनवते – प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे.

कर्जत प्रतिनिधी -मुन्ना पठाण

कला,लेखन माणसाला अमर बनवते – प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे.


प्रतिनिधी कर्जत – मुन्ना पठाण दि.३

कला,लेखन माणसाला अमर बनवते ते शरीराने आपल्यात नसले तरी विचाराने,कलेने जिवंत असतात.असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
जेष्ठ पत्रकार,चित्रकार आणि लेखक कवि प्रा. रा. ना.तथा दिनेश रोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवरांना स्मृतीपुरस्कार वितरण कार्यक्रमात शिंदे बोलत होते.यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत,माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे,माजी नगरसेविका हर्षदा काळदाते,सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल,कवी प्रकाश घोडके,नगरसेवक अमृत काळदाते, भाऊसाहेब तोरडमल,डॉ.अतुल रोडे,इंजि. पृथ्वीराज रोडे,इंजि.जयंती रोडे-बनकर यांच्यासह राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे पुढे म्हणाले की, कलाकार माणसे आपल्या धुंदीत जगत असतात.कला माणसाला काहीतरी वेगळे करण्याची क्षमता वाढते. शिक्षण हे उदरनिर्वाहाचे साधन नाही.भगवंताने प्रत्येकाला कला,हुनर दिलेली असते ती समृद्ध करता आली पाहिजे.आपल्यात काय हे शोधत आले पाहिजे आपण आज नुसत्या मार्कांच्या मागे पळत सुटतो आहे.पालकांनी,शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद झाला पाहिजे.सर्व शिक्षण मार्कांसाठी सुरू आहे. अवांतर पुस्तके वाचनाकडे वळले पाहिजे.वेगळे केलेल्या लोकांची नोंद इतिहास ठेवते.जगण्याकडे गामभिर्याने पाहिलं पाहिजे.पैसे कमविणे म्हणजे जीवन नाही ते कमवले पाहिजे पण योग्य पद्धतीने मिळवा. आई वडिलांची स्वप्न मोठी असली पाहिजे.संकटांना सामोरे जाता आले पाहिजे.असं जगा की इतिहासाने नोंद घेतली पाहिजे. आई वडिलांचा आदर करा.जिवंत माणसांना जपा ती गेल्यानंतर परत संवाद नाही.ज्या दिवशी आपल्या कर्तृत्वावर आई वडील टाळ्या वाजिवतील तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा असेल.आई बापाला अभिमान वाटेल असे कर्तृत्व कमवा.
चौकट:-विविध पुरस्काराचे वितरण….!
यावेळी कला,साहित्य,पत्रकारीता,पर्यावरण, सामाजिक आदी पुरस्कारांचे मान्यवरांना वितरण करण्यात आले. यात पर्यावरणाचा पुरस्कार सर्व सामाजिक संघटनेला देण्यात आला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे