ब्रेकिंग

कर्जत तालुक्यातील कोरेगाव सह दोन ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व..

कर्जत प्रतिनिधी -

कर्जत तालुक्यातील कोरेगाव सह दोन ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व..


कर्जत प्रतिनिधी –


कर्जत तालुक्यातील महत्वाच्या गणल्या जाणाऱ्या कोरेगाव ग्रामपंचायत सह दोन ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आल्यानंतर कर्जत मध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. बापुराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये फाळके गटाचे सहा उमेदवार तर शेळके गटाचे सात उमेदवार विजयी झाले आहेत.
कर्जतच्या माजी सभापती पुष्पा शेळके यांचे पती युवराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली श्री कोरेश्र्वर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी फाळके यांच्या नेतृत्वाखाली श्री कोरेश्र्वर शेतकरी ग्रामविकास पॅनलने लढत दिली.अटीतटीच्या लढतीत शेळके गटाने बाजी मारली.
दोन्ही गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :ताई दादासाहेब कोळेकर (३९९), श्रीकांत निवृत्ती वाघ (३४३), शशिकला हनुमान शेळके (४१६), सुषमा विजय पाचपुते (४७३), अंजली विनोद मुरकुटे (५००), रोहिदास विठ्ठल अडसूळ (५१४), मालन शिवाजी मुरकुटे (५२१), जयवंत शिवाजीराव फाळके (६४६), दिलीप राजाराम जाधव (३९०), जयश्री गंगासिंग परदेशी (५८३), बदामबाई भद्रीसिंग परदेशी (५८१), अनिल कुंडलिक शेळके (४८२), मुरलीधर काशिनाथ मुळीक (५०९) कर्जत तहसील कार्यालयापासुन ते गोदड महाराज मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे