ब्रेकिंग

बजाज फायनान्स विरोधात सामान्य माणसाचा यशस्वी लढा

कर्जत प्रतिनिधी

बजाज फायनान्स विरोधात सामान्य माणसाचा यशस्वी लढा


सामान्य माणसाला पण न्याय मिळतो फक्त लढण्याची तयारी पाहिजे
दादा परबत राऊत रा.पोंधवडी ता.करमाळा सोलापूर
 दिनांक 13/ 07/2019 रोजी फ्लिपकार्ट ऍप वरून नवीन मोबाईल आँनलाईन घेतला होता बजाज फायनान्स EMI कार्ड वरून घेतला होता मी 30/09/2019 रोजी दोन महिन्यांत पूर्ण EMI ऑनलाईन भरुन त्याच दिवशी ऑनलाईन noc देखील मिळाली होती पण पुर्ण EMI भरल्यानंतर पणं दिनांक 02/10/2019 रोजी व 04/10/2019 रोजी अनुक्रमे 295 +295 रुपये चार्ज अकाउंट मधून कट केला मी पैसे कट करण्याचें कारण बँकेमध्ये विचारले असता बँकेने मला सांगितले बजाज फायनान्सचे तुमच्या वरती कर्ज आहे त्यांनी ऑनलाईन बँकेला ECS टाकल्यामुळे तुमच्या खात्यात मिनी मन बॅलन्स नसल्यामुळे तुम्हाला चार्ज लागला आहे मी बँकेला सांगितले बजाज फायनान्सचे कर्ज वनटाईम भरले आहे माझ्याकडे एनओसी पण आहे पण बँक ऐकून घेत नव्हती बजाज फायनान्सला याबद्दल विचारणा केली असता त्यांनी पण उडवा उडवीचे उत्तर दिले मग मी माहिती अधिकार महासंघाचे कार्यअध्यक्ष माननीय शेखर कोलते सर व राहुल कदम व विजय सागर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत Lawyer उदय चव्हाण यांना सर्व प्रकार सांगितला व मला कायदेशीर सल्ला मागितला सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्राहक मंच औरंगाबाद येथे तक्रार दाखल केली फक्त 590 रुपयांसाठी अडीच वर्षे सातत्याने पाठपुरावा करून यश संपादन प्राप्त केल माननीय जिल्हा ग्राहक मंच औरंगाबाद यांनी बजाज फायनान्स यांना 10000 दंड ठोठावला व अतिरिक्त 590 रुपये कटलेले 3.25 टक्के व्याजाने देण्याचा निकाल दिला आहे मला एकच म्हणायचं आहे सामान्य माणसाला पण न्याय मिळतो फक्त लढण्याची तयारी पाहिजे
श्री दादा परबत राऊत, पोंधवडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर
9423834207
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे