कृषीवार्ताब्रेकिंग

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, इफको व कर्जत तालुका फार्मर्स प्रोडूसरसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथे शेती शाळेचे आयोजन करण्यात आले

कर्जत प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, इफको व कर्जत तालुका फार्मर्स प्रोडूसरसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथे शेती शाळेचे आयोजन करण्यात आले..


कर्जत प्रतिनिधी –


कर्जत येथे शेती शाळेचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभाग, इफको व कर्जत तालुका फार्मर्स प्रोडूसरसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथे शेती शाळेचे आयोजन करण्यात आले .यावेळी तालुका कृषी अधिकारी माननीय श्री पद्मनाभ मस्के साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली .यावेळी सध्यामध्ये शेतीमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्ञानो युरिया तंत्रज्ञान याविषयी माननीय श्री देसाई साहेब उपमहाप्रबंधक इफको कंपनी अहमदनगर यांनी नॅनो युरिया चे फायदे व आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच कार्यक्रमांमध्ये संतुलित खताचा वापर यामध्ये रासायनिक व जैविक खताची कशी सांगड घालावयाची याविषयी डॉक्टर एम एस पवार साहेब ,वरिष्ठ व्यवस्थापक इफको कंपनी ,पुणे यांनी् सविस्तर विवेचन केले . यानंतर कार्यक्रमांमध्ये मका पिकावरील अळीचा जीवनक्रम आणि व्यवस्थापन पद्धती याविषयी मंडळ कृषी अधिकारी मिरजगाव श्री अमर अडसूळ साहेब यांनी उपयुक्त अशी माहिती दिली. सदरील शेती शाळेमध्ये तुर पिकामध्ये शेंडा खुडणे याविषयी यांत्रिक पद्धत श्री निरंजन तोरडमल, मेकॅनिकल इंजिनियर यांनी त्यांनी बनवलेले यंत्र व आवश्यकता याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रियाा उद्योग योजनेविषयी डॉक्टर कैलास पाटील जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी शेतकरी, बचत गट, युवक यांना ही योजना कशी फायदेशीर आहे व त्यासाठी असणारे शासनाचे पस्तीस टक्के अनुदान याविषयी मार्गदर्शन केले तसेच शेती शाळेमध्ये तुर पिकामध्ये येणाऱ्या मर. तुर पिकामध्ये येणारा मर व व्हायरस रोग याविषयी आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनारसे एल टी कृषी सहाय्यक यांनी केले . सदरील कार्यक्रमासाठी श्री रूपचंद जगताप साहेब कृषी अधिकारी पंचायत समिती कर्जत तसेच श्री विक्रमशेठ गदादे,
अध्यक्ष कृषी सेवा केंद्र कर्जत ,सर्व कृषी सहाय्यक, सर्व कृषी पर्यवेक्षक व कृषी विभागाचा पूर्ण स्टाफ यावेळी उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी कर्जत श्री अनिल बापकर साहेब यांनी केले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन श्री शरद (अण्णा ) म्हेत्रे ,अध्यक्ष कर्जत तालुका फार्मर्स प्रोडूसरसर कंपनी यांनी अतिशय सुंदर रित्या केले सदरील कार्यक्रमासाठी कृषी सेवा केंद्र चालक अध्यक्ष संघटना श्री विक्रम गदादे कृषी अधिकारी पंचायत समिती कर्जत श्री रूपचंद जगताप साहेब कृषी अधिकारी पंचायत समिती कर्जत कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी वपंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सदरेल कार्यक्रमासाठी उपस्थित होते
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे