गुन्हेगारीब्रेकिंग

मिरजगाव येथील ग्राम विकास अधिकार्यांला मारहाण

कर्जत प्रतिनिधी

 

 

मिरजगाव येथील ग्राम विकास अधिकार्यांला मारहाण


 

कर्जत प्रतिनिधी-    ता.५:


तालुक्यातील मिरजगाव येथील ग्राम विकास अधिकारी शरद कवडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामसेवकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून संघटनेमार्फत जिल्हा ग्रामसेवक ग्रामपंचायत कामकाज बंदची हाक देण्यात आली आहे.यातील सर्व आरोपीवर शासकीय कामकाजात अडथळा सह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिरजगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली आहे.
या बाबत वृत्त असे की शरद कवडे हे शासकीय कामकाज येत्या १३ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या लोक अदालत कर वसुलीच्या थकबाकी बाबत आज लक्ष्मी मिल ची करथकबाकी व विना परवाना बांधकाम नोटेसा बजावण्यासाठी गेले असता त्यांना शहाजी करपे, कल्याण गवारे महादेव गवारे इतर पाच (सर्व रा कोकणगाव ता कर्जत )जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली . तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कवडे यांना गंभीर दुखापत झाली आहे कवडे स्वतः हृदयविकाराचे रुग्ण असल्यामुळे त्यांना त्याचा जबर मानसिक धक्का बसला आहे असे कवडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे तसेच समवेत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांना सोडवले आहे.
जिल्ह्यात ग्रामसेवक प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना माननीय लोक अदालतचे काम करत असताना सात ते आठ जणांनी कायदा हातात घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करावी अशी एक मुखी मागणी ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी प्रसिद्धी पत्रकात द्वारे केली आहे
या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून या घटनेचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहेत
यावर कठोर कारवाई न झाल्यास सोमवार ता. ८ ऑगस्ट २०२२ पासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतचे काम बंद राहतील असा इशारा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे