गुन्हेगारीब्रेकिंग

कर्जत हल्ला प्रकरणात सहा आरोपी अटक..

कर्जत प्रतिनिधी

कर्जत हल्ला प्रकरणात सहा आरोपी अटक..


गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे..कर्जत मध्ये एका सनी पवार या युवकास काही मुलांच्या टोळक्याने जबर मारहाण केली होती.
त्यामधील दोन आरोपी
1. सोहेल शौकत पठाण, वय 28
2. अरबाज कासम पठाण वय 25 दोघे रा. लोहार गल्ली, कर्जत पोलिसांनी अटक केली. सदर आरोपींना उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपींना 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे.
तसेच आरोपी 3.जुनेद जावेद पठाण 19 आणि एक अल्पवयीन 17 (असलेबाबत सांगत आहे) दोघे राहणार लोहार गल्ली कर्जत तालुका कर्जत यांना पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्यांना मदत करणारे 5.हुसेन कासम शेख वय 40 , पिंपळे गुरव अरुण कंट्रक्शन च्या पाठीमागे पिंपरी चिंचवड, 6. अरबाज अजित शेख, वय 24 राहणार पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या आरोपींना माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे पोलीस हवालदार सुनील चव्हाण बबन मखरे दत्ता हिंगडे सागर ससाने जालिंदर माने बबन बेरड यांनी चिंचवड पुणे येथून मोठ्या शिताफीने मध्यरात्री ताब्यात घेऊन आज रोजी कर्जत येथे हजर केल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्या करून पळून जाण्यासाठी वापरलेली ईरटीगा गाडी MH 16 AT 4278 ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे.
आरोपी शोध कामी वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल कटके सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे पोलीस हवालदार सुनील चव्हाण बबन मखरे दत्ता हिंगडे सागर ससाने जालिंदर माने बबन बेरड कर्जत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित अमरजित मोरे, अनंत सालगुडे, भगवान शिरसाठ पोलीस जवान संभाजी वाबळे, भाऊसाहेब काळे, शाहूराजे टिकते व केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे