क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

श्री.संजय तुपे यांना राज्यस्तरीय आदर्श संगीत कलारत्न पुरस्काराने सन्मानित..

मिरजगाव प्रतिनिधी

श्री.संजयजी तुपे यांना राज्यस्तरीय आदर्श संगीत कलारत्न पुरस्काराने सन्मानित..


मिरजगाव -प्रतिनीधी


मिरजगाव येथील स्वर मंदीर संगीत विद्यालयाचे संचालक श्री. संजयजी तुपे यांना आविष्कार सोशल फाऊंडेशन कोल्हापूर सांगली या संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय आदर्श संगीत कलारत्न पुरस्कार नुकताच सांगली येथे प्रदान करण्यात आला.
सांगली जिल्ह्याचे शिक्षक आमदार अमृत लाड यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष उज्वला पाटील, डॉ.विजया पवार, राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, नामवंत ज्येष्ठ साहित्यिक श्री.कु्॒राहडे व संगीतक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री.तुपे हे सध्या नुतन माध्यमिक विद्यालय मिरजगाव येथे नोकरी करत आहेत.गेली तीस वर्षापासून संगीत क्षेत्रात कार्यरत असुन, त्यांनी अनेक शिष्य उत्कृष्ठ तबला वादक गायक घडविले आहेत
संजयजी तुपे (संगीत अलंकार) अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई अंतर्गत स्वर मंदीर संगीत विद्यालय चालवत असुन ग्रामीण भागातील हे पहिलेच केंद्र आहे. तुपे यांनी आजपर्यंत नगर, बीड,पुणे,बारामती, सोलापूर, नाशिक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले आहेत. त्यांचे अनेक शिष्य सिने संगीत, शास्त्रीय संगीत, भजन, गझल या प्रकारात पारंगत आहेत. त्यांच्या या संगीत क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांना सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांचे आ.रोहित पवार, आ.प्रा.राम शिंदे,रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.ए.बी.चेडे, प्राचार्य दत्तात्रय श्रीमंदीलकर, गुरूवर्य श्री.अनील डोळे, पंडीत राम व बाबुराव बोरगांवकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
————————————————————-
सांगली – आविष्कार फौंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने संगीत अलंकार श्री. संजय तुपे सपत्नीक कलारत्न गौरव पुरस्कार घेताना .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे